बुलढाणा: आजपावेतो मध्यम स्वरूपाच्या पावसाची हजेरी लावणाऱ्या मलकापूर तालुक्यात आज उत्तररात्री कोसळधार पावसाने हजेरी लावली! यामुळे शेती पाण्याखाली गेली असून नदी नाले एक झाल्याचे वृत्त आहे. यामुळे हजारो ग्रामस्थ भयभीत झाले असून प्रशासनाने मदत करण्याची मागणी होत आहे.काल मध्यरात्रीनंतर रिमझिम स्वरूपात सुरू झालेल्या पावसाचा नंतर जोर वाढला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तररात्री अडीच वाजतापासून तालुक्यात संततधार पावसाने तालुक्यात ठिकठिकाणी हजेरी लावली. कुंड-खुर्द भागात आकाश फाटल्यासारखा पाऊस झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यामुळे शेताना शेततळ्याचे स्वरूप प्राप्त झाले. पान्हेरा परिसरात पावसाने रौद्ररूप धारण केले. नाल्याला मोठा पूर आला. मागील ५० वर्षातील हा सर्वात मोठा पूर असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. जिकडेतिकडे पाणीच पाणी असे चित्र होते. अनेक घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. शेती व खरीप पिकांची नासाडी झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to heavy rain in malkapur taluka water entered the houses and agriculture scm 61 amy
Show comments