नागपूर : मुंबईत मुसळधार पाऊस झाल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबईहून नागपूरला येणाऱ्या तसेच नागपूरमार्गे धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या विलंबाने धावत आहेत तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.मुंबईत रविवार आणि सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत सोमवारी पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले. पण, मुंबईहून नागपूरकडे आणि मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना त्यांचा फटका बसला.

रेल्वेगाडीने मुंबईकडे निघालेल्या प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. रेल्वे रुळावर पावसाचे पाणी साचल्याने तसेच काही भागात दरड कोळसल्याने ठिकठिकाणी रेल्वेगाड्या थांवबण्यात आल्या. मुंबईतील पूर परिस्थितीमुळे चेन्नई – जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेस आणि बंगळुरू – पटना हमसफर एक्सप्रेस रद्द करण्यात आली. तर पावसाच्या तडाख्यामुळे एर्नाकुलम – पटना सुपरफास्ट एक्सप्रेस (नागपूर मार्गे), नवी दिल्ली- सिकंदराबाद जंक्शन तेलंगाना एक्सप्रेस, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर दूरन्तो एक्सप्रेस, कामाख्या- मुंबई एलटीटी कर्मभूमी एक्सप्रेस, विदर्भ सुपरफास्ट एक्सप्रेस, नवी दिल्ली- चेन्नई अंदमान एक्सप्रेस, हजरत निजामुद्दीन – बेंगळुरु राजधानी एक्सप्रेस, कोच्चुवेली – गोरखपूर राप्ती सागर सुपरफास्ट एक्सप्रेस, मुंबई लोकमान्य तिलक टर्मिनस – पुरी सुपरफास्ट एक्सप्रेस (टिटिलागड मार्गे), मेहबूबनगर – गोरखपूर विशेष गाडी, सिकंदराबाद- निझामुद्दीन एक्सप्रेस विशेष गाडी, चेन्नई- जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेस, दानापूर – विश्वेश्वरय्या टर्मिनल बंगळुरू सुपरफास्ट स्पेशल, नवी दिल्ली- चेन्नई तामिळनाडू एक्सप्रेस, बंगळुरू- पाटना हमसफर एक्सप्रेस, मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस – हटिया सुपरफास्ट एक्सप्रेस, बंगळुरू – हजरत निजामुद्दी राजधानी एक्सप्रेस, हैदराबाद- नवी दिल्ली तेलंगणा एक्सप्रेस विलंबाने धावत असल्याचे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
mumbai lhb coaches train
कोकण मार्गावरील एक्सप्रेसला जोडले जाणार एलएचबी डबे, प्रवाशांच्या सुरक्षेत होणार भर
india railway viral news Husband-Wife Fight
नवरा-बायकोतील भांडण अन् रेल्वेचे तीन कोटींचे नुकसान! OK मुळे चुकीच्या स्थानकावर पोहोचली ट्रेन; नेमकं घडलं काय? वाचा…
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
Shocking viral video of ac local train crowd in Mumbai air conditioned local trains are disappointing shocking video goes viral
एसी ट्रेनचं तिकीट काढताय? मुंबईतल्या रेल्वे स्टेशनवरचा ‘हा’ VIDEO पाहून धडकी भरेल; पाहा नेमकं काय घडलं?

हेही वाचा >>>‘भाईगिरी करोंगे तो ऐसेही मरोगे’… शेकडो बघ्यांसमोर तरुणास भोसकले; यवतमाळच्या दत्त चौकातील थरार

दरम्यान, मुंबईहून येणारी विदर्भ एक्सप्रेस आज तब्बल १२ तास आणि दुरान्तो एक्सप्रेस चार तास विलंबाने नागपुरात पोहचली. तर मुंबई पावसाने तुंबल्याने इंडिगो एअरलाइन्सचे फ्लाइट क्रमांक ६ई ८०४ हे मुंबई-नागपूर विमान रद्द करण्यात आले. हे विमान मुंबईहून सकाळी ७.४५ वाजता उड्डाण भरून नागपूर येथे सकाळी ९.१५ वाजता पोहचणे अपेक्षित होते. मात्र, पावसामुळे विमान वेळेवर रद्द करावे लागले. त्याचप्रमाणे इंडिगो एअरलाइन्सचे फ्लाइट क्रमांक ६ई ५१२४ हे विमान ४ तास २१ मिनिटे विलंबाने मुंबईहून नागपूर येथे पोहचले. नियोजित वेळापत्रकानुसार विमान मुंबई येथून सकाळी ६.१० वाजता उडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात या विमानाने सकाळी १०.१५ वाजता नागपूरच्या दिशेने उड्डाण भरले. सकाळी ५ वाजतापासून घरून निघालेल्या प्रवाशांना पाच तास मुंबई विमानतळावर बसून राहावे लागले. तर इंडिगो एअरलाइन्सचे फ्लाइट क्रमांक ६ई ६१४५ विमान नागपूर येथून सकाळी ८.१५ वाजताऐवजी दुपारी १२.३३ वाजता मुंबईकडे उडाले. फ्लाइट क्रमांक ६ई ५००२ विमान ४१ मिनिटे विलंबाने मुंबईला पोहचले.