नागपूर: मेट्रोच्या कनेक्टिव्हीटीत वाढ करण्यात आम्ही कमी पडलो, अशी सष्ष्टोक्ती दिल्यावर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डिकर यांनी दैनंदिन प्रवासी संख्या दोन लाखांवर नेण्याचा संकल्प व्यक्त केला होता. त्या दिशेने त्यांनी पावले टाकणे त्यांनी सुरू केली आहेत. सोमवारपासून मेट्रोच्या एकूण फेऱ्यांमध्ये २५ टक्क्यांनी वाढ होणार असून दर दहा मिनिटांनी प्रवाशांना गाडी उपलब्ध होणार आहे.
मेट्रोच्या प्रवासी संख्येत चढउतार सुरू आहे. कधी लाखांवरतर कधी पन्नास हजारावर ही संख्या थांबते, सहा महिन्यापूर्वी ५६ हजारावर प्रवासी मेट्रोतून दरदिवशी प्रवास करीत होते सध्या ही संख्या ८० हजाराच्या घरात आहे. दैनंदिन प्रवासी संख्येचे लक्ष दोन लाखांचे आहे. ते साध्य करण्यासाठी महामेट्रोचे प्रयत्न सुरू आहे. त्यातलाच एक भाग म्हणून नागपूरमध्ये मेट्रोच्या फेऱ्यांची संख्या २५ टक्के वाढवण्यात आली आहे.
हेही वाचा… कन्हान नदीला पूर, नागपूरच्या पाणी पुरवठ्यावर काय होणार परिणाम?
त्यानुसार या सेवा सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ४ ते ७ वाजता दरम्यान उपल्बध राहील. अन्य वेळी या मेट्रो सेवा नियमित प्रमाणे दर १५ मिनिटांनी उपलब्ध असेल. असे महामेट्रोकडून सांगण्यात आले.
फेऱ्यांच्या संख्येत वाढ का?
दररोज व नियमित पणे मेट्रो प्रवाश्याची संख्या वाढत असून फेऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी नागरिकांची होती. त्याची दखल घेऊन फेऱ्या वाढवण्यात आल्या. महामेट्रोकडून सांगण्यात आले. मेट्रो सेवा मध्ये वेळ कमी झाल्याने प्रवासी संख्या मध्ये वाढ होण्यास मदत होईल ,ज्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. विशेषत: सकाळच्या वेळेत, जेव्हा विद्यार्थी शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवास करतात तेव्हा गाड्यांची वारंवारता वाढवण्याची मागणी होती, त्याचप्रमाणे कार्यालयात जाणारे प्रवासी आणि इतर व्यवसायाच्या ठिकाणी प्रवास करतात ते देखील मेट्रो स्थानकांवर गर्दी करतील. संध्याकाळी जेव्हा विद्यार्थी आणि इतर लोक त्यांच्या घरी जाण्याच्या वेळेस मोठ्या प्रमाणात उपयोग करतील.