नागपूर: देशात पहिल्यांदाच एकाच वेळी अरबी समुद्रात “तेज” आणि बंगालच्या उपसागरात “हामुन” अशा दोन चक्रीवादळाची निर्मिती झाली. दरम्यान, बंगालच्या उपसागरात बांगलादेशजवळ सक्रिय असलेले चक्रीवादळ ‘हामून’ धोकादायक बनले आहे. त्याच्या प्रभावामुळे आज देशातील पाच राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

येत्या बारा तासांत त्रिपुरा, नागालँड, मणिपूर, मेघालय आणि मिझोराममध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. २५ ऑक्टोबरला दुपारी या चक्रीवादळाने चितगावच्या दक्षिणेला बांगलादेश किनारा ओलांडला होता. त्याचा वाऱ्याचा वेग ताशी ७५ ते ८५ किमी राहील. सध्या हे वादळ कमकुवत होऊन खोल दबावात रूपांतरित झाले आहे.

हेही वाचा… अमरावती: घरबसल्या ऑनलाईन रेटींग देण्याचे काम पडले महागात; तब्‍बल ३२ लाख रूपयांची फसवणूक

हे वादळ आज कमकुवत होऊ शकते, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्याच बरोबर आणखी एक समान चक्रीवादळ आंध्र प्रदेश किनारपट्टीपासून उत्तर पश्चिम बंगालच्या उपसागरावर समुद्रसपाटीपासून १.५ ते ३.१ किमी उंचीवर असल्याचे देखील हवामान खात्याने म्हटले आहे. गेल्या २४ तासात लक्षद्वीप, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, आसाम, मेघालय आणि नागालँडमध्ये हलका पाऊस झाला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to influence of cyclone hamoon heavy rainfall is predicted in five states of india today rgc 76 dvr