वाशीम : मृग नक्षत्र लागून पंधरवाडा संपण्याच्या मार्गावर आहे. तरीही पावसाची कुठलीच आशा नाही. पेरणीपूर्वी मशागतीची कामे आटोपली असून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र पाऊसच नसल्याने पेरणीचे नियोजन कोलमडणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गत वर्षी मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावल्याने वेळेत पेरणी झाली होती. मात्र, या वर्षी मृग नक्षत्र संपण्याच्या मार्गावर आहे तरीदेखील पावसाची कुठलीच आशा दिसत नाही. दरवर्षी मृग नक्षत्रात पाऊस होताच पेरण्याची लगबग राहते. शेतकऱ्यांची खते, बी बियाणे खरेदी बऱ्यापैकी झालेली असून पावसाची प्रतीक्षा आहे. विविध यंत्रणांकडून दिलेला पावसाचा अंदाज सपशेल अपयशी ठरला असल्याने शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा – पोलीस भरतीत बनावट क्रीडा प्रमाणपत्राचा वापर, गडचिरोली पोलिसांकडून चौकशी सुरू
मृग नक्षत्रात खासकरून उडीद, मूग व इतर पिक पेरणीवर शेतकऱ्यांचा जोर असतो. या हंगामात पेरणी केलेल्या पिकांना भरघोस उत्पन्न होते. अशी शेतकऱ्यांना अशा आहे. परंतु मृग नक्षत्र कोरडा जाण्याची शक्यता असल्याने पेरण्या लांबण्याची शक्यता आहे.