गोंदिया- आठवडाभरापासून पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यातील धान पिके करपू लागली आहे. पुढच्या काही दिवसांत पाऊस न आल्यास पिके हातून जाण्याची स्थिती आहे. यापूर्वी बरसलेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले होते, मात्र, आता गरजेचे वेळी पावसाने दडी मारली.दुसरीकडे ऊन्ह तापू लागले.तापमान ३३ अंशावर गेले आहे. परिणामी, पिके करपू लागली. आता पाणी मिळाले नाही, तर उन्हामुळे पिके सुकणार अशी स्थिती आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात पूरपरिस्थिती होती. सर्वदूर पावसामुळे मागील वर्षी कित्येकांची पिके वाहून गेली होती. यंदा उलट स्थिती आहे. मागील वर्षी ३१ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात सरासरी १,३६४.३ मिमी पाऊस झाला होता. यंदा आतापर्यंत ८१६.३ मिमी पाऊस पडला. यंदा सरासरी ५४८ मिमी पावसाची तूट आहे.