गोंदिया: जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवरील कामाचा ताण वाढतच चालला आहे. शिक्षणाचा खालावलेला दर्जा, शैक्षणिक धोरण आणि कामचुकार शिक्षक, या आधीच्या समस्या आहेतच, त्यात बिगर शैक्षणिक कामांचीही भरमार आहे. भरतीचे प्रमाण कमी आणि सेवानिवृत्तीचे प्रमाण जास्त असल्याने गुरुजींचा ताप वाढतच चालला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात दरवर्षी २०० पेक्षा अधिक शिक्षक सेवानिवृत्त होत आहेत. त्याप्रमाणात मागील १० वर्षात शिक्षक भरती करण्यात आली नाही. गाव व पाड्यात जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. या शाळांमध्ये लाखोहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांचा शैक्षणिक दर्जा व गुणवत्तेवर गेल्या अनेक वर्षांपासून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्याचप्रमाणे खालावलेल्या पटसंख्येचा ठपकाही शिक्षकांवरच ठेवला जात आहे. एका शिक्षकावर अनेक वर्गांची शैक्षणिक जबाबदारी आहे. याशिवाय राज्य शासनाचे शैक्षणिक धोरण व दररोज निघणारे परिपत्रक आणि त्यांची अंमलबजावणी यासर्व बाबीत गुरफटलेले शिक्षक शैक्षणिक दर्जा उंचावणार तरी कसा? असा प्रश्न निर्माण होत आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर जिल्हा परिषदेच्या शाळा शिक्षकांअभावी ओस पडतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

१७८ शाळांमध्ये प्रत्येकी एक शिक्षक

एकीकडे शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शोधून त्यांना शाळांमध्ये प्रवेश देण्याची मोहीम शिक्षण विभाग राबवत आहे, तर दुसरीकडे शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांची वानवा आहे. गोंदिया जिल्हा परिषदेच्या १७८ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी एकच शिक्षक आहे. त्यामध्ये आमगाव तालुक्यात ८, अर्जुनी मोरगाव तालुक्यात २२, देवरी तालुक्यात ४६, गोंदिया तालुक्यात ११, गोरेगाव तालुक्यात १६, सडक अर्जुनी तालुक्यात १८, सालेकसा तालुक्यात ३२ आणि तिरोडा तालुक्यात २५ शाळांचा समावेश आहे, अशी माहिती स्वत: शिक्षण विभागानेच दिली आहे. एका शिक्षकावर चार वर्गांची जबाबदारी असल्याने सर्व विद्यार्थ्यांना एकत्र शिकवणे शिक्षकांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून त्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to low recruitment rate and high retirement rate the workload of zilla parishad teachers continues to increase in gondia sar 75 dvr
Show comments