चंद्रपूर : देशात हुकूमशाहीची मूहुर्तमेढ रोवण्यासाठी धर्मा-धर्मात, जाती- जातींमध्ये तेढ निर्माण करण्याच्या हेतूने विषारी बीज पेरले जात आहे. “मुह मे राम बगल मे छुरी’ अशी दुटप्पी भूमिका ठेवणाऱ्या मनुवादी विचारांमुळे देश गुलामगिरीच्या वाटेवर लोटल्या जात आहे. संविधानातील लोकशाहीची नीतिमूल्य जर टिकवायची असेल तर बहुजन नायक महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन पेटून उठा, अन्यथा देश खड्ड्यात लोटला जाईल, असे सूचक विधान माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्रांतीभूमी चिमूर येथे आयोजित क्रांतीसूर्य महात्मा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमास उद्घाटक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, चंद्रपूर काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, ओबीसी विभागाचे जेसाभाई मोटवानी, अनुसूचित जाती सेलचे प्रफुल खापर्डे, चिमूर विधानसभा क्षेत्र काँग्रेसचे युवा नेते दिवाकर निकुरे जिल्हा महासचिव गजानन बुटके इत्यादी उपस्थित होते.

हेही वाचा – काँग्रेसमधील अंतर्गत लाथाळ्यांमुळे ओबीसी जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

वडेट्टीवार म्हणाले की, देशातील सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षातील महत्त्वपूर्ण नेत्यांच्या मागे स्वायत्त संस्थांचे काष्ठशुक्ल लावले आहे. रावणाने केलेल्या सितेच्या अपहरणाची पुनरावृत्ती करीत बाळासाहेबांची शिवसेना बळकावली. तर अनेकांना रडारवर ठेवून देशातील लोकशाहीला समूळ नष्ट करण्याचे कटकारस्थान आखून हुकूमशाही राजवटीच्या मार्गावर देशाला आणून ठेवले आहे. देशातील दुर्बल घटक असलेल्या समाजाच्या आरक्षणावर गडांतर आणण्याचे काम आता सुरू झाले असून खासगी स्रोतामार्फत नोकरी भरती हे त्याचे प्रथम उदाहरण होय. अशा मनुवादी विचारांच्या विरोधात पेटून उठणे काळाची गरज असून स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढण्याची आज वेळ आल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.

हेही वाचा – “मी गंगा-भागिरथी नाही”, यशोमती ठाकूर कडाडल्या, म्हणाल्या, “महिलांना पुन्हा गुलामगिरीच्या जोखडात..”

राष्ट्रसंतांच्या क्रांतिभूमीतून सलग तीनदा आमदार होण्याचा बहुमान मला मिळाला. काँग्रेसच्या गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिमूरच्या राजकारणाला ग्रहण लावण्याचे कार्य काँग्रेसमधीलच काही अपयशींकडून सुरू आहे. याला थारा न देता पूर्वीप्रमाणेच काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी एकजुटीने संघर्षाची भूमिका ठेवून क्रांती भूमीत विजय पताका फडकवा, असे आवाहन केले. याप्रसंगी प्रसिद्ध नाट्य कलावंत तथा गायक अनिरुद्ध वनकर यांचा प्रबोधनात्मक “मी वादळ वारा’ या बहारदार भीम गीतांचा कार्यक्रम पार पडला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to manuvadi ideas the country is on the path of slavery former minister vijay wadettiwar statement at a program in chimur rsj 74 ssb
Show comments