गोंदिया: देवरी तालुक्यातील चिचगड येथील तुलसीदास सूरज धानगाये, वय ३३ वर्षे हा युवक अनेक दिवसापासून मानसिक तणावात असल्यामुळे मागील चार दिवसापासून तो झोपला नाही.

गुरूवारी तर तो आपल्या एका हातात चाकू घेऊन घरांमधे व मोहल्ल्यात फिरत होता. सदर युवकाची आई व पत्नी यांनी त्याला समजुत देऊन सुध्दा तो कोणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. त्याच्या हातातील चाकूने तो स्वतःला जखमी करून घेत असल्याचे त्याच्या आई वडिलानां निदर्शनात आले. निदर्शनात येताच त्यांनी चिचगड येथील ग्रामपंचायत सदस्या शाहीन सैयद यांना माहिती दिली. त्यांनी चिचगड पोलिस स्टेशन येथे संपर्क साधला व त्वरित पोलीस निरीक्षक शरद पाटील हे आपल्या पोलीस पथकासह अंमलदार तेजराज कोठेही, कमलेश शहारे, संदीप तांदळे यांच्यासह घटनास्थळी पोहोचले असता, सदर तरुणाने स्वतःला एका खोली मध्ये डांबून घेतले.

satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Many students in Pune face fatigue and mental stress due to lack of inadequate food intake
शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या अनेक विद्यार्थ्यांची आबाळ, आरोग्य सर्वेक्षणातून काय झाले उघड?
Manmohan singh and sharad pawar
Dr. Manmohan Singh Passes Away : “जागतिक धुरंधर नेता गमावला”, शरद पवारांनी डॉ. मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती

हेही वाचा… बावरिया टोळीची विदर्भातील वाघांवर वक्रदृष्टी; तब्बल १५ वाघांच्या शिकारीचे लक्ष्य, आतापर्यंत चार वाघांची शिकार

हातातील चाकूने तो स्वत:च्या हातावर कापून घेत असल्याचे त्यानां निदर्शनात आले. त्या युवकाने शरीरावर ठिक – ठिकाणी स्वतःला जखमा करून घेतले असल्याचे निदर्शनात येताच पोलीस निरीक्षक शरद पाटील यांनी अंमलदार यांच्या मदतीने त्या बंद रूमचा दरवाजा तोडत त्या युवकाला बाहेर काढले. तत्काळ चिचगड येथिल ग्रामीण रुग्णालयात उपचारास्तव दाखल केला.

हेही वाचा… गोतस्करीला बल्लारपूर न्यायालयाची चपराक; ‘हे’ दिले आदेश…

सदर युवकाला पोलीस निरीक्षक शरद पाटील यांनी योग्य प्रकारे त्याचे समुपदेशन करत भविष्यात असे पाऊल उचलले जाणार नाही यासाठी त्याला सकारात्मक विचार करून जीवनाला सामोरे गेले पाहिजे असे मार्गदर्शन केले.

Story img Loader