लोकसत्ता टीम

अकोला : रेल्वेच्या ‘नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक’मुळे मध्य रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या तब्बल ३२ रेल्वे गाड्या रद्द, आठ गाड्यांच्या मार्गात बदल, तर चार गाड्यांच्या निर्धारित स्थानकात बदल करण्यात आला आहे.

private bus drivers, Amravati, RTO, action by RTO,
अमरावती : खासगी बसचालकांना दणका, आरटीओकडून दंडात्मक कारवाई
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
mmrda planning to build a creek bridge from kasarvadavali to kharbav in bhiwandi
ठाणे आणि भिवंडी शहरातील अंतर कमी होणार; कासारवडवली ते खारबाव खाडीपुलासह जोडरस्ता प्रकल्पाची आखणी
Badlapur, chemical sewage channel, underground sewerage scheme, old channel, sewage Badlapur, l
बदलापूर : रासायनिक सांडपाणी वाहिनीचा प्रश्न सुटणार! १२८ कोटींच्या भुयारी गटार योजनेला सुरुवात, जुनी वाहिनी बदलणार
Why is the surrender of Naxalite godmother Tarakka important
३४ वर्षांपासून चळवळीत… १७० हून अधिक गुन्हे, चार राज्यांत १ कोटींचे बक्षीस… नक्षलींची ‘गॉडमदर’ तारक्काचे आत्मसमर्पण का महत्त्वाचे?
Problems faced by disabled passengers due to lack of online railway ticket purchase facility
ऑनलाइन रेल्वे तिकीट खरेदीची सुविधा नसल्याने अडचणी; अपंग प्रवाशांची रांगेत परवड
yard remodeling trains
नागपूर : यार्ड रि-मॉडेलिंगसाठी दिल्ली मार्गावरील काही रेल्वेगाड्या रद्द
Central railway special trains cancelled delayed
१० महिन्यात २०२ विशेष रेल्वेगाड्या रद्द, १ हजार १४६ विशेष गाड्यांना बिलंब

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमधील नागपूर विभागात येणाऱ्या कळमना रेल्वे स्टेशन येथे राजनांदगाव ते कळमनादरम्यान तिसऱ्या मार्गिकेला जोडण्यासाठी ‘नॉन इंटरलॉकिंग’ कार्य करण्यात येत आहेत. त्यामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या गाड्यांना या ‘नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक’ चा मोठा फटका बसला आहे. गाडी क्रमांक १२८३४ हावडा -अहमदाबाद एक्सप्रेस १० आणि ११ ऑगस्टला रद्द, गाडी क्रमांक १२८३३ अहमदाबाद -हावडा एक्सप्रेस १३ आणि १४ ऑगस्टला रद्द, गाडी क्रमांक १२८६० हावडा -मुंबई गीतांजली एक्सप्रेस ०५, ०७, ११ आणि १२ व गाडी क्रमांक १२८५९ मुंबई- हावडा गीतांजली एक्सप्रेस ०७, ०९, १३ आणि १४ ऑगस्ट रोजी धावणार नाही. गाडी क्रमांक १८०३० शालिमार -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस ११ ते १७ ऑगस्टपर्यंत रद्द, गाडी क्रमांक १८०२९ लोकमान्य टिळक टर्मिनस -शालिमार एक्सप्रेस १३ ते १९ ऑगस्टपर्यंत रद्द, गाडी क्रमांक २२८४६ हटिया -पुणे एक्सप्रेस ०५ आणि ०९ रोजी रद्द, गाडी क्रमांक २२८४५ पुणे -हटिया एक्सप्रेस ७ आणि ११ ऑगस्ट रोजी रद्द, गाडी क्रमांक १२८८० भुवनेश्वर -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस ८ आणि १५ ऑगस्ट रोजी रद्द, गाडी क्रमांक १२८७९ लोकमान्य टिळक टर्मिनस -भुवनेश्वर एक्सप्रेस १० आणि १७ ऑगस्ट रोजी रद्द, गाडी क्रमांक १२८१२ हटिया -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस १६ ऑगस्ट रोजी रद्द, गाडी क्रमांक १२८११ लोकमान्य टिळक टर्मिनस -हटिया एक्सप्रेस १८ ऑगस्ट रोजी रद्द, गाडी क्रमांक १२२२२ हावडा -पुणे दुरांतो एक्सप्रेस १५ ऑगस्ट रोजी रद्द, गाडी क्रमांक १२२२१ पुणे -हावडा दुरांतो एक्सप्रेस १७ ऑगस्ट रोजी रद्द.

आणखी वाचा-भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:च केला खुलासा, म्हणाले “फक्त माध्यमांमध्ये चर्चा”

गाडी क्रमांक २०८५७ पुरी -साई नगर शिर्डी एक्सप्रेस ०९ आणि १६ ऑगस्ट रोजी रद्द, गाडी क्रमांक २०८५८ साई नगर शिर्डी – पुरी एक्सप्रेस ११ आणि १८ ऑगस्ट रोजी रद्द, गाडी क्रमांक १२९९३ गांधीधाम -पुरी एक्सप्रेस १६ ऑगस्ट, गाडी क्रमांक १२९९४ पुरी -गांधीधाम एक्सप्रेस १९ ऑगस्ट रोजी रद्द, गाडी क्रमांक २२९३९ ओखा -बिलासपूर एक्सप्रेस १० आणि १७ ऑगस्ट रोजी रद्द, गाडी क्रमांक २२९४० बिलासपूर -ओखा एक्सप्रेस १२ आणि १९ ऑगस्ट रोजी रद्द, गाडी क्रमांक २०८२२ संतराकाछी – पुणे एक्सप्रेस १७, गाडी क्रमांक २०८२१ पुणे -संतराकाछी एक्सप्रेस १९ ऑगस्ट रोजी रद्द, गाडी क्रमांक २२८९४ हावडा -साईनगर शिर्डी एक्सप्रेस ०८ आणि १५ ऑगस्ट रोजी रद्द, गाडी क्रमांक २२८९३ साईनगर शिर्डी – हावडा एक्सप्रेस १० आणि १७ ऑगस्ट रोजी रद्द, गाडी क्रमांक २२९०५ ओखा -शालिमार एक्सप्रेस १८ ऑगस्ट रोजी रद्द, गाडी क्रमांक २२९०६ शालिमार -ओखा एक्सप्रेस २० ऑगस्ट रोजी रद्द, गाडी क्रमांक २२९७३ गांधीधाम -पुरी एक्सप्रेस १४ ऑगस्ट रोजी रद्द, गाडी क्रमांक २२९७४ पुरी -गांधीधाम एक्सप्रेस १७ ऑगस्ट रोजी रद्द, गाडी क्रमांक २२८२७ पुरी -सुरत एक्सप्रेस ११ ऑगस्ट व गाडी क्रमांक २२८२८ सुरत -पुरी एक्सप्रेस १३ ऑगस्ट रोजी रद्द, गाडी क्रमांक २०८२३ पुरी -अजमेर एक्सप्रेस ५ आणि ८ ऑगस्ट, गाडी क्रमांक २०८२४ अजमेर -पुरी एक्सप्रेस ६, ८ आणि १३ ऑगस्ट रोजीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

आणखी वाचा-शिवरायांची जयंती आता आग्रा किल्ल्यातील ‘दिवाण-ए-खास’मध्ये दरवर्षी होणार…!

गाडी क्रमांक १२१०५ मुंबई -गोंदिया विदर्भ एक्सप्रेस १३ ते १८ ऑगस्टपर्यंत वर्धा स्थानकावरून जाईल. ही गाडी वर्धा ते गोंदिया दरम्यान रद्द राहील. १४ ते १९ ऑगस्टदरम्यान विदर्भ एक्सप्रेस वर्धा स्थानकावरूनच सुटणार आहे. गाडी क्रमांक ११०३९ कोल्हापूर -गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस १२ ते १७ ऑगस्टपर्यंत वर्धा स्थानकापर्यंतच धावेल. १४ ते १९ ऑगस्टपर्यंत गोंदिया ऐवजी वर्धा येथून आपल्या निर्धारित वेळेत सुटेल. गाडी क्रमांक १२१५१ लोकमान्य टिळक टर्मिनस -शालिमार एक्सप्रेस १४ आणि १५ ऑगस्ट रोजी भुसावळ, इटारसी, न्यू कटनी जंक्शन, बिलासपूर मार्ग वळवली जाईल. भुसावळ ते बिलासपूर दरम्यान गाडी रद्द राहील. गाडी क्रमांक १२१५२ शालिमार – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेसचा देखील १४ आणि १५ ऑगस्ट रोजी हाच बदलेला मार्ग राहील. गाडी क्रमांक २२५१२ कामाख्या -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस ०३, १० आणि १७.०८.२०२४ रोजी बर्धमान जंक्शन, आसनसोल, न्यू कटनी जंक्शन, इटारसी, भुसावळ मार्ग वळवली जाईल. गाडी क्रमांक २२५११ लोकमान्य टिळक टर्मिनस – कामाख्या एक्सप्रेसचा देखील ६, १३ आणि २० रोजी याच वळवलेल्या मार्गाने धावेल. गाडी क्रमांक १३४२५ मालदा टाऊन -सुरत एक्सप्रेस १० आणि १७ रोजी आसनसोल, न्यू कटनी जंक्शन, इटारसी, भुसावळ मार्ग वळवली जाईल. गाडी क्रमांक १३४२६ सुरत – मालदा टाऊन एक्सप्रेस १२ आणि १९ ऑगस्टला याच मार्गाने जाईल. गाडी क्रमांक २२८४७ विशाखापट्टम -लोकमान्य टिळक टर्मिनस १८ ऑगस्ट रोजी विशाखापट्टम, विजयवाडा, बल्लारशाह, वर्धा, भुसावळ मार्ग वळवली जाईल. गाडी क्रमांक २२८४८ लोकमान्य टिळक टर्मिनस -विशाखापट्टम २० ऑगस्टला याच मार्गाने धावेल.

Story img Loader