यवतमाळ : जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या पावसाने शुक्रवारी रात्री रौद्ररूप धारण केले. विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटात अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उंचावर वसलेल्या यवतमाळ शहरात गेल्या काही वर्षात यावेळी प्रथमच अनेक भाग जलमय झाला आहे. शहरातील अनेक भागात पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याने नागरिक रात्रीपासून स्वतःच्या बचावासाठी धावपळ करीत आहेत. कळंब येथे चक्रवर्ती नदीला गेल्या वीस वर्षात प्रथमच महापूर आल्याने नदीकाठावरील वस्तीत पाणी शिरत आहे. यवतमाळ – महागाव मार्गावरील दही सावळी येथे नागपूर-तुळजापूर महामार्गावरील पुलावर दहा ते बारा फूट पाणी असल्याने महागावकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे.

हेही वाचा >>>विदर्भात सर्वत्र मुसळधार पाऊस; भंडारा, गोंदियात वीज कोसळून पाच जणांचा मृत्यू, २७ जखमी

दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील अडान नदीला पूर आल्याने यवतमाळ – दारव्हा मार्गही बंद आहे. जिल्ह्यातील बहुतांश नद्या दुधडी भरून वाहत आहे. जिल्ह्यात अनेक गावातही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. वणी, राळेगाव आदी तालुक्यात वर्धा नदीला पूर आल्याने या नदीकाठावरील गावांमध्येही पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे.यवतमाळ शहरात संभाजीनगर, एकलव्य नगर, आमराई, आर्णी रोड, दत्त चौक भागात पाणी रस्त्यावरून वाहत आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांच्या सोयीसाठी मदत कक्ष सुरू केलाअसून मदतीकरिता हेल्पलाईन ०७२३२-२४०७२०, ०७२३२-२४०८४४, ०७२३२-२५५०७७ जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ हा क्रमांक दिला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to rain in yavatmal district many parts of the city got waterlogged nrp 78 amy