भारतीय हवामान खात्याने भंडारा जिल्ह्यात पावसाचा ‘रेड अलर्ट’ घोषित केल्याने जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय शाळा, अंगणवाडी, शिकवणी वर्ग उद्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुसळधार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता संभाव्य धोका टाळण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय शाळा, अंगणवाडी, शिकवणी वर्ग यांना जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी उद्या (बुधवार १०ऑगस्ट) सुटी जाहीर केली आहे. या आदेशाचे उलंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.