अकोला : रेल्वे प्रशासनाकडून सुविधेसह प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता विशेष गाड्यांच्या परिचालन कालावधीमध्ये वाढ करण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०१२११ बडनेरा ते नाशिक विशेष मेमू गाडीच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. या बदलाचा प्रभाव ०१ एप्रिलपासून लागू होईल.गाडी क्रमांक ०१२११ बडनेरा ते नाशिक विशेष मेमू व गाडी क्रमांक ०१२१२ नाशिक ते बडनेरा विशेष मेमू ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे.
गाडी क्रमांक ०१२११ बडनेरा ते नाशिक विशेष मेमू गाडीच्या वेळेत बदल करण्यात आले आहे. बडनेरा येथून १०:०५ वाजता सुटेल आणि नाशिक रोड येथील आगमन १९:०५ वाजता होईल. मूर्तिजापूर आगमन १०:३०, सुटणे १०:३२, बोरगांव आगमन १०:४८, सुटणे १०:५०, अकोला आगमन ११:०२, सुटणे ११:०५, शेगांव आगमन ११:३३, सुटणे ११:३५, नांदुरा आगमन १२:०३, सुटणे १२:०५, मलकापूर: आगमन १२:३८, सुटणे १२:४०, बोदवड आगमन १३:३७, सुटणे १३:३८, भुसावळ आगमन १५:०५, सुटणे १५:१०, जळगांव आगमन १५:३५, सुटणे १५:३७, पाचोरा आगमन १६:०५, सुटणे १६:०७, चाळीसगांव आगमन १६:३८, सुटणे १६:४०, नांदगांव: आगमन १७:२०, सुटणे १७:२२, मनमाड आगमन १७:५०, सुटणे १७:५२, लासलगांव आगमन १८:०५, सुटणे १८:०७, निफाड: आगमन १८:२५, सुटणे १८:२७, नाशिक रोड येथे १९:०५ वाजता आगमन होईल.
आरपीएफद्वारा जागरूकता अभियान
भुसावल मंडल आरपीएफद्वारा ग्रामीण क्षेत्रांमध्ये रेल्वे सुरक्षा बाबत जागरूकता अभियान राबविण्यात आले. या अभियानाचा उद्देश ग्रामीणांना रेल्वे सुरक्षा नियमांची माहिती देणे आणि अपघात टाळण्यासाठी त्यांना जागरूक करणे आहे. या अभियानाअंतर्गत अकोला आणि सावदा गावांमध्ये विशेष जागरूकता अभियान आयोजित करण्यात आले.
रेल्वे रुळा जवळ आपल्या जनावरांना सोडू नका, कारण अनेक वेळा जनावरे रेल्वे रुळावर जातात. ज्यामुळे अपघात होतात. यामुळे केवळ जीवित आणि मालमत्तेची हानी होत नाही, तर रेल्वे वाहतूकही प्रभावित होते. रेल्वे रुळाजवळ शेतात आग लावू नका, कारण आग खूप मोठ्या प्रमाणात रेल्वे इंजिन किंवा इतर उपकरणांपर्यंत पोहोचू शकते, ज्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो, अशा सूचना देण्यात आल्या. या अभियानाचा मुख्य उद्देश रेल्वे प्रवासाबाबत जागरूक करणे आणि त्यांची सुरक्षा सुनिश्चित करणे आहे. या माहितीला त्यांनी गांभीर्याने घेतल्यास आणि रेल्वे रुळाजवळ सुरक्षा नियमांचे पालन केल्यास, ग्रामीण क्षेत्रांमध्ये रेल्वे सुरक्षा आणि जागरूकतेची संवेदनशीलता वाढवता येईल.