लोकसत्ता टीम
नागपूर : राज्यातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी वगळता पावसाने जवळजवळ राज्यातून काढता पाय घेतला आहे.
एकीकडे देशातील उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये पाऊस धो धो कोसळत असताना महाराष्ट्रावर त्याची वक्रदृष्टी कायम आहे. जून आणि जुलैचा पहिला आठवडा वगळला, तर त्याच महिन्याच्या अखेरपासून मात्र पावसाने मारलेली दडी ऑगस्ट अखेरपर्यंत कायम आहे.
आणखी वाचा-समृद्धीवर प्राण्यांमुळे ८३ अपघात, आणखी कोणत्या कारणाने किती अपघात…
पावसाने राज्यातून काढता पाय घेतल्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. एकिकडे शेतीचे नुकसान आणि दुसरीकडे कर्जाची टांगती तलवार अशाच परिस्थितीमध्ये हा शेतकरी अडकला आहे.
काही दिवसांपूर्वीच हवामान विभागानं सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतरच पावसासाठी पूरक वातावरण निर्माण होईल अशी शक्यता वर्तवली होती. त्यानंतर आता सात सप्टेंबरमध्ये पाऊस परतणार असे सांगितले आहे.