नागपूर : गुरुवारी रात्री वादळी पावसामुळे वैमानिकाला नागपुरात विमान उतरवता आले नाही. त्यामुळे सुमारे एक तास ते विमान आकाशातच घिरट्या घालत राहिले.

दिल्लीहून नागपूरला येणारे इंडिगोचे विमान रात्री नऊच्या सुमारास नागपूर विमानतळावर उतरणार होते. त्यासाठी वैमानिकाने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला परवानगी मागितली होती.

हेही वाचा – यवतमाळ बाजार समितींच्या निवडणुकीत प्रस्थापितांना दे धक्का; पालकमंत्री संजय राठोड व माजी मंत्री माणिकराव ठाकरे गृह मतदारसंघात ‘फेल’

मात्र त्याचवेळी विजांचा कडकडाट आणि वादळ सुरू होते. त्यामुळे विमान उतरवण्याची परवानगी मिळाली नाही. वैमानिकाने सुमारे एक तास आकाशात घिरट्या घातल्या. प्रवाशांना नेमके काय होत आहे, हे कळत नव्हते. दिल्ली ते नागपूर अंतर सुमारे दीड तासांचे आहे. पण जवळपास अडीच तास विमान उडतच असल्याने प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली होती. रात्री सुमारे १० च्या सुमारास पाऊस थांबल्यानंतर विमान उतरवण्याची परवानगी मिळाली.

Story img Loader