नागपूर: केरळ समुद्र किनाऱ्यालगत तयार झालेल्या वातावरणीय प्रणालीमुळे राज्याच्या काही भागात पाऊस, तर काही भागात तापमानात वाढ होण्याची अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

वातावरणीय प्रणालीच्या प्रभावामुळे राज्यात पुढील तीन दिवस ढगाळ हवामान राहून काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि लगतच्या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर कमी झाला असून बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेने येत असल्याने राज्यभरात किमान तापमानात सरासरी एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.

air pollution in Mumbai news
मुंबईची हवा पुन्हा प्रदूषित; कुलाबा, कांदिवली येथे ‘वाईट’ हवेची नोंद
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
possibility of cloudy weather in maharashtra due to low pressure area formed in bay of bengal
रविवारपासून पुन्हा ढगाळ वातावरण; जाणून घ्या, थंडीची लाट, कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम
water pipe bursts in Dombivli
डोंबिवलीत काँक्रीट रस्ते काम करताना जलवाहिनी फुटली;  पी. पी. चेंबर्सजवळ शेकडो लीटर पाणी वाया
temperature declined in central Maharashtra
उत्तर महाराष्ट्र गारठला, मध्य महाराष्ट्रातील पारा खाली
minimum temperatures in north Maharashtra
Maharashtra Weather Update : थंडीत आणखी वाढ होणार ? जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रासाठीचा अंदाज
water supply Bandra area, Bandra,
मुख्य जलवाहिनीतून गळती, वांद्रे परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम
Pune Water Supply, Water Resources Department,
पुण्याच्या पाण्याचे नियंत्रण जाणार जलसंपदा विभागाच्या ताब्यात? नक्की काय आहे कारण !

हेही वाचा… अमरावती जिल्ह्यात परेदशी पाहुण्यांची वर्दळ! लालसर छातीची फटाकडी, समुद्री बगळ्याची प्रथमच नोंद

दक्षिण भारतात ईशान्य मोसमी पाऊस सक्रिय झाल्यामुळे राज्यात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केरळ किनार्‍याजवळ अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाले आहे. ते कोकण किनार्‍यालगत आहे. त्यामुळे दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर राज्यातील इतर भागात किमान किंवा रात्रीच्या तापमानात किरकोळ वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

Story img Loader