लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोंदिया: गुरुवार ४ मे पासून अनेक रेल्वेगाड्यांची चाके थांबविण्यात आलेली आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे रायपूर रेल्वे विभागाच्या रायपूर-रायपूर आरव्ही ब्लॉक हट दरम्यान दुसरा रेल्वे मार्ग आणि रायपूर यार्डच्या आधुनिकीकरणाचे काम ४ ते १० मे दरम्यान प्रस्तावित आहे.

त्यामुळे या संदर्भातील घोषणा करून रेल्वेने गोंदिया – डोंगरगढ – रायपूर दरम्यान धावणाऱ्या २० लोकल गड्याची चाके थांबविली आहेत. यामुळे याचा अतिरिक्त ताण हा स्थानिक एस.टी.बस स्थानकावर पडला असल्याचे चित्र आज स्थानकावरील वाढलेल्या प्रवाशांच्या गर्दीच्या निमित्ताने दिसून आले.

हेही वाचा… वर्धा : अवकाळी पावसामुळे भाजीपाला स्वस्त, शेतकरी मात्र त्रस्त

या मार्गावर खाजगी ट्रॅव्हल्स ची सोय मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे रेल्वे प्रवासाचा पर्याय म्हणून एकमात्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस हीच पर्यायी व्यवस्था आहे. यामुळे त्या रद्द झालेल्या २० लोकल गाड्यांच्या प्रवाशांनी बस स्थानकाकडे धाव घेतल्याने गोंदियात जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा, आमगाव, देवरी ही स्थानके प्रवाशांची तोबा गर्दी झालेली आहेत.

हेही वाचा… नागपूरकरांचा ई-वाहनांकडे वाढता कल

सध्या महाराष्ट्र शासनाच्या महीला सन्मान योजना, शाळांची लागलेली सुटी आणि मोठ्या प्रमाणात लग्न सराईचे दिवस सुरू असल्याने गर्दी तर होतीच पण या २० ट्रेन अगदी याच मोसमात रद्द झाल्यामुळे एस. टी. च्या बस स्थानकाच्या गर्दीत आणखीच भर पडलेली आहे.

हेही वाचा… कैद्यांद्वारे निर्मित वस्तूंची आता ‘ऑनलाईन’ विक्री

लग्न सराईचे दिवस आणि महिला सन्मान योजनांमुळे बस स्थानके आधीच गर्दीने भरली आहेत. त्यात आता रेल्वे रद्दचा अतिरिक्त भार पडलेला असल्याचे मागील दोन दिवसापासून दिसून येत आहे असे गोंदिया एस. टी. आगार व्यवस्थापक संजना पटले यांनी सांगितले

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to the cancellation of 20 trains crowd of passengers at st bus stops in gondia sar 75 dvr
Show comments