नागपूर: कन्हान नदीला आलेल्या पुरामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राच्या विहिरीत पाणी शिरले आहे. त्यामुळे शहराच्या काही भागात पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. गुरूवारी मध्यरात्रीशुक्रवारीपासून शुक्रवारी दुपारपर्यंत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कन्हान नदी दुथडी भरून वाहू लागली. त्यातच शुक्रवारी सायंकाळी नवेगाव खैरी जलाशयाचे सर्व १६ दरवाजे उघडण्यात आल्याने कन्हान नदीला पूर आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाण्याच्या पातळीत दर तासाला ०.५ मीटरने वाढत आहे. नदीचे पाणी कन्हान जलशुद्धीकरण विहिरीत शिरल्याने जलशुद्धीकरणाच्या कामावर परिणाम झाला आहे. सध्या तीनपैकी एकाच पंप सुरू आहे. शनिवारी पाण्याच्या पातळीत घट होताच कच्चे पाणी शुद्ध करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.

हेही वाचा… पाऊस कमी तरीही गडचिरोलीत पूरस्थिती, राष्ट्रीय महामार्ग बंद

यामुळे कन्हान फीडरच्या मुख्य भागातून पाणीपुरवठा आशी नगर झोन, सतरंजी पुरा झोन, लकरगंज झोन आणि नेहरू नगर झोन आदी भागातील वस्त्यांना पाणी पुरवठा कमी दाबाने होईल किंवा काही भागात होणार नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to the flooding of the kanhan river water supply is likely to be affected in some parts of nagpur cwb 76 dvr
Show comments