लोकसत्ता टीम
बुलढाणा: अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आलेल्या राधिका विलास इंगळे या बालिकेच्या हत्येचा उलगडा व मारेकऱ्याचा तपास लागत नसल्याने चिखलीतील नागरिकांत संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. यामुळे चिखली शहरात आज सोमवारी (दि. १५) स्वयंस्फुर्त कडकडीत बंद पाळण्यात आला. ‘आम्ही चिखलीकर’ च्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते.
त्याला चिखलीकरांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. बंदमध्ये सर्व पक्ष, सामाजिक संघटना, नागरिक व व्यापारी सहभागी झाल्याने दैनंदिन व्यवहार ठप्प झाले. डीपी मार्ग, चिंच परिसर, बस स्थानक परिसर, जयस्तंभ परिसरातील लहानमोठी दुकाने, प्रतिष्ठान, ‘शोरूमस’, टपरीवजा दुकाने बंद असल्याचे दिसून आले. या प्रकरणी अंढेरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र तपासाला गती मिळत नसल्याने पोलीस अधिक्षक सुनील कडासने यांनी तपासासाठी विविध पथके गठीत केली. मारेकरी हाती लागत नसल्याने राजकीय, सामाजिक क्षेत्रात संतप्त प्रतिक्रिया उमटत असल्याने पोलीस विभाग दवाबात आल्याचे चित्र आहे.
हेही वाचा… अकोला शहरातील इंटरनेट सेवा बंद; शहरात तणावपूर्ण शांतता; बाजारपेठ बंद, कोट्यवधींचे व्यवहार ठप्प
बाळापूर (जिल्हा अकोला) तालुक्यातील रहिवासी असलेली राधिका (६ वर्षे) आपल्या आई वडिलांसह चिखली परिसरात आयोजित लग्न समारंभासाठी आली होती. चिखली तालुक्यातील रोहडा येथील मंदिर परिसरातून ती बेपत्ता झाली.
हेही वाचा… अकोला : संचारबंदीमुळे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या
पोलीस, नातेवाईक व नागरिकांच्या अथक शोधानंतर तिचा मृतदेह मंदिराच्या मागील बाजूस आढळून आला. तिच्या गळ्यात रुमालाचा फास तर मृतदेहावर दगडांची पाळ रचण्यात आली. १४ तारखेला शव विच्छेदन करण्यात आले.