अकोला : यंदा नैसर्गिक आपत्तीचा तुरीच्या पिकाला जोरदार फटका बसला. त्यामुळे उत्पादन घटले आहे. मर्यादित उत्पादन लक्षात घेता तुरीचा दर वाढला आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला विक्रमी दर मिळत असून तुरीच्या भावाने १० हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

खरीप हंगामाच्या सुरुवातीला मौन्सून पावसाचे विलंबाने आगमन झाले. हंगामाचा सुरुवातीचा काळ कोरडा गेल्याने खरीपामध्ये पेरण्या उशिराने झाल्या. त्यामुळे यंदाचा हंगाम लांबला आहे. त्यातच सुरुवातीला अपुरा पाऊस व त्यानंतर अवकाळी पावसाने तुरीच्या पिकावर विपरित परिणाम झाला. तुरीचे पीक ऐन फुलधारणेच्या अवस्थेत असताना अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. ढगाळ वातावरण व अळीच्या प्रकोपामुळे तुरीच्या पिकाची अतोनात हानी झाली. तुरीवर विविध किडींचा देखील प्रादुर्भाव झाला. या सर्व प्रकारामुळे खरीप हंगामातील तूर पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट झाली.

हेही वाचा – अयोध्येतील राममंदिर उद्घाटनाचे निमित्त, नागपुरात मेट्रो भाड्यात ३० टक्के सवलत

सध्या तुरीची सोंगणी व काढणी केली जात आहे. जिल्ह्यात उत्पादनात प्रचंड घट झाल्याचे दिसून येत आहे. एकरी एक ते दोन क्विंटलच उत्पादन निघत आहे. शेतकऱ्यांच्या घरात तूर आल्यावर ती बाजारपेठेत विक्रीसाठी आणली जात आहे. बाजार समित्यांमध्ये नवीन तूर दाखल झाली असून, मुहूर्ताचा नऊ हजारांवर दर मिळाला. नववर्षात तुरीच्या दरात मोठी वाढ नोंदवल्या गेली. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमधे तुरीला वर्षाचा उच्चांकी १० हजार २८५ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बाजार समितीत चार हजार कट्ट्यांची आवक झाली. येत्या काळात बाजार समितीमध्ये आवक वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – ओबीसीबहुल नागपुरात मराठा सर्वेक्षणासाठी सात हजार कर्मचारी

दरात आणखी वाढ होणार

निसर्गाच्या लहरीपणामुळे तूर पिकावर विपरित परिणाम होऊन उत्पादन घटले आहे. घटलेले उत्पादन लक्षात घेता तुरीच्या दरात मोठी वाढ नोंदविण्यात आली. आगामी काळात तुरीच्या दरात आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी तूर विकण्याऐवजी साठवणुकीवर देखील भर दिला.