वर्धा : सकाळी आठ वाजेपासून वर्धा शहरात आज स्फोटकांच्या आवाजाने नागरिक चकित झाले. जवळपास एक तास हा गगनभेदी आवाज ठराविक आवाजाने गुंजत होता. भयभीत नागरिक चौकशी करू लागले. माहिती मिळाल्यावर मात्र सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तीस किलोमीटर अंतरावर भारतीय सैन्यदलाच्या दारूगोळा भांडार परिसरातून हे आवाज येत होते. मुदतबाह्य झालेले बॉम्ब गोळे ठराविक अंतराने निकामी केले जात असतात. तशी दवंडी लगतच्या गावात दिल्या जाते. मात्र, वर्धा शहरासाठी हा नवाच अनुभव होता. किती खोलीवर पुरून ते निकामी केल्या जातात,यावर आवाजाचे प्रमाण लहानमोठे होत जाते. मात्र लगतच्या सोनेगाव, येसगाव, मुरदगाव, केलापूर, जामनी, आगरगाव या गावांना चांगलाच हादरा बसतो.

हेही वाचा – चंद्रपूर : प्रेयसीवर पेट्रोल टाकून प्रियकराची आत्महत्या

एक दोन वर्षांपूर्वी तर गावातील कच्च्या घरांना भेगा पडण्याचे प्रकार होत होते. आता घरातील भांडे पडण्याचे प्रकार या स्फोटकांच्या आवाजाने घडतात. सोनेगाव परिसरात हे निकामी करण्याचे काम चालते. येथील सतीश दाणी सांगतात की दोन दिवसांपासून हे काम सुरू आहे. घरांना तडे जाण्याचा प्रकार आताही काही ठिकाणी घडत असतो.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to the sound of explosives citizens in wardha city shocked pmd 64 ssb
Show comments