बुलढाणा: भरमसाठ रिक्त पदे, त्यामुळे नियमित कार्यालयीन कामे करताना पडणारा ताण, त्यात सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘लाडकी बहीण’सारख्या योजनांचा भार आणि वर्षानुवर्षे प्रलंबित मागण्यांकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष, यामुळे बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील महसूल कर्मचारी वैतागले आहे. या निषेधार्थ आणि आपल्या मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने विविध टप्प्यात आंदोलन करण्यात येत आहे. बुधवारी जिल्हाभरातील शेकडो महसूल कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून शासनाचा निषेध नोंदवला. आज गुरुवार, ११ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने निदर्शने करण्यात आली. शासनविरोधात घोषणाबाजी करून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.

राज्याच्या अर्थसंकल्पात विविध योजनांचा पाऊस बरसला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सर्वत्र कौतुकाचा विषय ठरली. या योजनेच्या लाभासाठी राज्यातील हजारो महिला अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत गुंतल्या आहेत. असे असताना महसूल कर्मचाऱ्यांवर  अश्या विविध योजनांचा भार वाढला असल्याचे सांगत  मुख्य कामकाजावर प्रभाव पडत आहे. तसेच महसूल कर्मचाऱ्यांच्या इतर प्रलंबित मागण्यासंदर्भात आज ११ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महसूल कर्मचारी संघटनेतर्फे निदर्शने करत सरकार विरोधात रोष व्यक्त केल्या गेला. बुलढाणा येथील महसूल विभागात कार्यरत असलेले बहुसंख्य कर्मचारी व  महसूल कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी अ आंदोलनात  सहभागी झाले.  महिला कर्मचाऱ्यांचा लक्षणीय सहभाग दिसून आला.

Forest Minister Ganesh Naik was upset with officials response and warn to forest officials
अधिकाऱ्यांच्या उत्तराने वनमंत्री नाराज, वनाधिकाऱ्यांना दिली तंबी…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
1.5 lakh Pakistan government jobs
एका झटक्यात गेल्या दीड लाख सरकारी नोकऱ्या; पाकिस्तान अभूतपूर्व संकटात, नेमकं घडतंय तरी काय?
Image Of Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : सर्वसामान्यांना सरकारी कार्यालयांत ‘या’ सुविधा देणे बंधनकारक, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश
infosys salary
नारायण मूर्ती यांच्या ‘Infosys’ने पुढे ढकलला पगारवाढीचा निर्णय; कारण काय? आयटी कंपन्यांची स्थिती काय?
Indrayani river foams before Chief Minister Devendra Fadnavis visit to Alandi
इंद्रायणी पुन्हा फेसाळली; देवेंद्र फडणवीस याकडे लक्ष देणार का?
Ramdas Athawale Devendra Fadnavis Mayor post pune corporation
‘ उपमहापौर’ केले आता ‘ महापौर’ करा, रामदास आठवलेंची मागणी ! मंत्रीमंडळात स्थान देऊन देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळावा
Pune Municipal Corporation takes strict stand to recover outstanding income tax  Pune news
थकबाकीदारांची आता नळजोडतोडणी; परिमंडळनिहाय पथकांची नियुक्ती

हेही वाचा >>>भंडारा : अनोखे आंदोलन; मोर्चात चक्क म्हशी…

 संपूर्ण  राज्यभरात  महसूल कर्मचारी संघटनेतर्फे प्रलंबित मागण्या संदर्भात आंदोलन होत आहे. काल काळ्या फिती बांधून महसूल कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाज केले. आज निदर्शने करण्यात आली तर उद्या शुक्रवारी लेखनी बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेने सांगितले आहे.

बुलढाणा येथील महसूल विभागात कार्यरत असलेले बहुसंख्य कर्मचारी व  महसूल कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. संपूर्ण  राज्यभरात  महसूल कर्मचारी संघटनेतर्फे प्रलंबित मागण्या संदर्भात आंदोलन होत आहे. काल काळ्या फिती बांधून महसूल कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाज केले. आज निदर्शने करण्यात आली तर उद्या  लेखनी बंद करण्यात येणार असल्याचे संघटनेने सांगितले आहे.

हेही वाचा >>>गोंदिया : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे ; ‘या’ रेल्वे रद्द, कामकाज प्रभावित…

आकृतिबंध, पदवाढ चे काय?

 निदर्शन  आंदोलन पार पडल्यावर जिल्हाधिकारी किरण पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. महसूल कर्मचारी संघटनेचे नेते किशोर हटकर यांनी ‘लोकसत्ता ‘ सोबत  बोलताना सांगितले की,  महसूल  विभागाचा  आकृतीबंध २०१६ मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. तब्बल अठरा वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी अद्याप पदवाढ करण्यात आलेली नाही. राज्याच्या अर्थसंकल्पात नुकत्याच विविध घोषणा जाहीर झाल्या असून लाडकी बहीण ही त्यातील व्यापक योजना आहे. त्याचे कामकाज आणि अमलबजावणी याची संपूर्ण जवाबदारी  महसूल विभागावर ( अर्थात कर्मचाऱ्यांवर) सोपविण्यात आली आहे.  यामुळे इतर नियमित कामावर याचा परिणाम होत  असल्याचे हटकर म्हणाले. सामान्य जनतेच्या  प्रचंड रोषाचा सामना महसूल कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे . एवढेच नाही तर, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे, मारहाण करणे अश्या प्रकारच्या घटनाही समोर आल्यात. सरकारच्या विविध योजनांचा  ताण महसूलवर पडला आहे. हे, सरकारने लक्षात घेतले पाहिजे.  हा ताण सहन करणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे मात्र सर्रास दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा  आरोपही हटकर यांनी यावेळी केला.सुधारित आकृतीबंध तात्काळ मंजूर व्हावा, अव्वल कारकूनचे पदनाम बदलून सहाय्यक महसूल अधिकारी असे करण्यात यावे, पदवाढ आदि विविध प्रलंबित मागण्यांची तातडीने पूर्तता करावी अशी मागणी त्यांनी केली.

१२ तारखेला लेखणी बंद

दरम्यान या आंदोलनाच्या पुढील टप्यात उद्या शुक्रवारी लेखणी बंद आंदोलन करण्यात येणार आहे. यानंतरही शासनाने मागण्यांची पूर्तता न केल्यास १५ जुलै नंतर राज्यभरातील महसूल कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे.

Story img Loader