यवतमाळ जिल्ह्यात प्रचंड वादळासह झालेल्या पावसामुळे वीज यंत्रणा विस्कळीत झाली. पहाटे तीन वाजताच्या सुमारास खंडीत झालेला सहा उपकेंद्राचा आणि त्यावर अवलंबून असलेल्या २४३ गावाचा वीज पुरवठा महावितरण कर्मचाऱ्यांच्या अविरत प्रयत्नामुळे १० तासानंतर पूर्ववत करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वादळामुळे महावितरणच्या झालेल्या नुकसानाचे स्वरूप बघता विस्कळीत झालेल्या वीज यंत्रणेच्या दुरूस्ती कार्याला अमरावती परिमंडळाचे मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी आणि यवतमाळ जिल्ह्याचे प्रभारी अधीक्षक अभियंता दिपक देवहाते यांच्या मार्गदर्शनात गती देण्यात येत आहे. पहाटे तीनच्या दरम्यान झालेल्या चक्रीवादळासह पावसामुळे जिल्ह्यातील महावितरणच्या यवतमाळ विभागातील ३३ केव्ही वडगाव, ३३ केव्ही झाडगाव, ३३ केव्ही कोठा, पुसद विभागाअंतर्गत ३३ केव्ही निंभी भोजला, ३३ केव्ही चोंढी आणि पांढरकवडा विभागातील ३३ केव्ही मुरली सायखेडा या सहा उपकेंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही वीज वाहिनीवर तसेच या उपकेंद्रातून वीज पुरवठा करणाऱ्या लघुदाब वाहिनीवर झाडे उन्मळून पडल्याने २०४ विद्युत खांब तुटून पडले.

हेही वाचा… अमरावती : पोलिसांच्‍या हातावर तुरी देऊन कैद्याचे रुग्‍णालयातून पलायन

काही ठिकाणी आकाशातील विजेमुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होऊन इन्सुलेटर फुटल्यामुळे या उपकेंद्राचा वीज पुरवठा बंद पडला होता. परिणामी या सहा उपकेंद्रातून निघणारे ४६ फिडर बंद पडल्याने २४३ गावांना वीज पुरवठा करणारे २ हजार २११ रोहित्रे बंद पडली होती. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वादळ थांबताच युध्दस्तरावर दुरूस्ती कार्याला सुरूवात केल्यामुळे ३३ केव्ही कोठा उपकेंद्राचा वीज पुरवठा सकाळी १० वाजेपर्यंत सुरूळीत केल्याने या उपकेंद्रावरील २५ गावाचा वीज पुरवठा पुर्ववत करण्यात आला. झाडगाव उपकेंद्राचा वीज पुरवठा दिड तासातच पूर्ववत करण्याला यश आल्यामुळे या उपकेंद्रावरील १८ गावाचा वीज पुरवठा पुर्ववत झाला. यवतमाळ शहर आणि लगत असलेल्या गावांना वीज पुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही वडगाव उपकेंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या वाहिनीवर पडलेली झाडे तोडून बाजूला केल्यामुळे या उपकेंद्राचा वीज पुरवठा दुपारी १ वाजतानंतर पूर्ववत करण्यात यश आल्याने १८६ रोहित्रावरून वीज पुरवठा होणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत झाला.

हेही वाचा… शिंदे, फडणवीस विरुद्ध केदार, रामटेकचा निकाल ठरवणार कोण भारी ?

पुसद तालुक्यातील ३३ केव्ही चोंढी उपकेंद्राचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी सकाळचे सव्वा नऊ वाजले,परिणामी परिसरातील १५ गावाचा वीज पुरवठा पुर्ववत झाला.त्याचबरोबर पुसद तालुक्यातील निंभी भोजला या ३३ केव्ही उपकेंद्राचा वीज पुरवठा सुरळीत करण्याला दुसऱ्या दिवशी १ वाजले.त्यामुळे २४ गावांचा आणि ५७ रोहित्रांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले. महावितरणच्या पांढरकवडा विभागातील मुरली सायखेडा हे ३३ केव्ही उपकेंद्र बंद पडल्यामुळे १४७ रोहित्र आणि २० गावे बाधित झाली होती.परंतू महावितरणच्या अविरत प्रयत्नातून दुपारी १ वाजून ३६ मिनिटांनी या उपकेंद्राचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला.

हेही वाचा… वर्धेत थरकाप उडवणारी घटना, आतेभावावर गोळया झाडल्या

पर्यायी व्यवस्थेचा वापर करून वीज पुरवठा सुरळीत

वादळ वाऱ्याची परिस्थिती उदभवल्यानंतर विस्कळीत झालेली वीज यंत्रणा दुरूस्त करतांना महावितरणकडून टप्प्या-टप्प्याने प्रथम ३३ केव्ही वाहिनी व उपकेंद्राच्या दुरूस्तीचे काम हाती घेतल्या गेले. त्यानंतर ११ केव्ही वाहिन्यांसबंधीचे दुरूस्ती कामे केली गेली, नंतर वितरण रोहित्रे आणि फ्युज कॉल आणि वैयक्तिक तक्रारी आणि शेवटी कृषी वाहिन्यांची दुरूस्ती करण्यास प्राधान्य देण्यात येते. अनेक ठिकाणी पर्यायी वाहिनीचा, व्यवस्थेचा वापर करून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to unseasonal rain with storm wind in yavatmal district blackout in 243 villages nrp 78 asj