लोकसत्ता टीम
नागपूर: दक्षिण-पूर्व रेल्वेच्या चक्रधरपूर विभागात ११ ते १३ मे दरम्यान काम करण्यात येत असल्याने हावडा-मुंबई मार्गावरील गाड्यांवर परिणाम झाला आहे. काही गाड्या रद्द तर काही गाड्यांना विलंब होणार आहे.
टाटानगर ते इतवारी एक्सप्रेस १२ मे रोजी रद्द करण्यात आली. मुंबईहून ११ मे रोजी निघणारी मुंबई-हावडा एक्सप्रेस पावणेतीन तास विलंबाने सोडण्यात आली. योगनगरी ऋषिकेश येथून ११ मे रोजी निघणारी योगनगरी ऋषिकेश-पुरी उत्कल एक्सप्रेस दीड तास उशिरा निघाली.
दुर्ग येथून १२ मे रोजी निघणारी दुर्ग-राजेंद्रनगर साऊथ बिहार एक्सप्रेस दुर्ग येथून दीड तास विलंबाने निघेल. जबलपूर येथून ११ मे रोजी निघालेली जबलपूर-संतरागाछी हमसफर एक्सप्रेसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. ही गाडी राऊरकेला -हटिया-मुरी टाटानगर मार्गे धावत आहे.