वर्धा : कुही तालुक्यातील पाचगावच्या सिल्व्हर लेक फार्म या रिसॉर्टवर पोलीसांनी टाकलेल्या छाप्यात जिल्ह्यातील कृषी व्यावसायिक सापडले. त्याची चांगलीच चर्चा होत आहे. छाप्यात तोकड्या कपड्यातील तेरा तरुणी नृत्य करीत होत्या. तसेच विदेशी दारूचा महापूर असल्याचे कारवाईत स्पष्ट झाले. ४८ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात प्रामुख्याने वर्धा जिल्ह्यातील आंबटशौकीन असल्याचे दिसून आले. ते अश्लील नृत्य करणाऱ्या पोरींवर पैसे उधळत असल्याची नोंद झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता हा सर्व प्रकार आयजीच्या जीवावर बायजी उदार असल्याचे दिसून आले. ही पार्टी एका कृषी कंपनीने दिल्याचे उघड झाले आहे. नामवंत कृषी केंद्रचालक गोविंद जेठलाल जोट्वानी,संजय सत्यनारायण राठी, अभय व्यंकटेश सकांडे,अतुल ज्ञानेश्वर चाफ्ले, विशाल माणिक वाणी, आशिष नत्थु साकांडे, हर्षल भाऊराव माळवे,विजय सदाशिव मेश्रम, प्रवीण महादेव पाटील, आशिष तुकाराम चापडे, कौसार अली, प्रशांत ज्ञानेश्वर धोंगडे, प्रवीण रामभाऊ बिडकर, सतीश वाटकर, महेश महादेव मेश्राम, राकेश विठल भांडेकर, अविनाश शंकर पंधराम, आकाश किसणा पिंपळे या सर्वांनी बियाणे विक्रीचे टार्गेट पूर्ण केले होते. त्याबद्दल त्यांना एका कृषी कंपनीने छम छम पार्टी देण्याचे ठरवून रिसॉर्ट वर नेले. मात्र तेच पोलिसांचे टार्गेट झाले. जिल्ह्यात दारूबंदी म्हणून हे आंबटशौकीन सज्ज होत लेक वर गेले अन् फसले, त्याची चांगलीच चर्चा होत आहे.