नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपानमधील आयटी क्षेत्रातील कंपनी ‘एनटीटी-डेटा’ या कंपनीच्या उपाध्यक्षांची भेट घेऊन त्यांना नागपूरमध्ये गुंतवणूक करण्याबाबत विनंती केली आहे. टोकियो येथे मुख्यालय असलेली ही कंपनी माहिती तंत्रज्ञान आणि व्यवसाय सेवा क्षेत्रातील जागतिक पातळीवरील मोठे नाव आहे. राज्यात पुण्यातही एनटीटीचे डेटा सेंटर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – बुलढाणा: जिजामाता साखर कारखाना सुरू होणार; व्यंकटेश शुगर्सने घेतला विकत

हेही वाचा – यवतमाळ : मित्राला मागितले दहा हजार, त्याने नकार देताच थेट गळयावर फिरवला चाकू….

फडणवीस यांनी दौऱ्याच्या चौथ्या दिवशी म्हणजे गुरुवारी एनटीटी डेटाचे उपाध्यक्ष हिदेएकी ओझाकी यांची भेट घेतली. राज्यात डेटा सेंटर धोरण तयार करण्यात येत आहे. त्यामुळे एनटीटीने राज्यात मुंबई, पुण्याव्यतिरिक्त अन्य शहरांचासुद्धा गुतंवणुकीसाठी विचार करावा. नागपूर हे मध्य भारतातील महत्त्वाचे ठिकाण आहे. आयआयएमच्या मदतीने नागपुरात सरकारच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजेंस सेंटर सुरू केले जात आहे. त्यात एनटीटी सहकार्य करू शकते, असे फडणवीस यांनी ओझाकी यांना सांगितले. त्यावर हिदेएकी ओझाकी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, निश्चितपणे आम्ही नागपूरला भेट देऊ असे सांगितले, असे या भेटीसंदर्भातील शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: During devendra fadnavis visit to japan japanese company was invited to invest in nagpur what was discussed cwb 76 ssb