शफी पठाण
नागपूर : स्वतंत्र विदर्भाच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी वर्धा येथे आयोजित ९६ व्या मराठी साहित्य संमेलनात विदर्भवाद्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. विदर्भ राज्य आंदोलन समितीचे सुमारे ५० वर कार्यकर्ते सर्वसाधारण श्रोते म्हणून संमेलनाच्या मंडपात पोहोचले. आधी सर्व भाषणे होऊ दिली व ऐन संमेलनाध्यक्षांच्या भाषणावेळी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी जाेरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री व्यसपीठावरच असताना त्यांच्या समोरच नारेबाजीने संमेलनाचा नूर पालटला. विदर्भ वाद्यांमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. यावेळी स्वतंत्र विदर्भ न देणाऱ्या राजकीय नेत्यांचा निषेधाचा ठराव, स्वतंत्र विदर्भाचा ठराव मांडण्याचा मागणी करण्यात आली. या अनपेक्षित घोषणाबाजीने पोलिसांची तारांबळ उडाली. अखेर सर्वांना ताब्यात घेण्यात आले.