बुलढाणा: जळगाव तालुक्यातील मोठी असलेल्या सुनगाव ग्रामपंचायतच्या सरपंचावरील अविश्वास प्रस्तावादरम्यान ग्रामपंचायत परिसरात पोलिसांसमोरच कार्यकर्त्यांनी राडा केला. विरोधी पक्षाच्या तीन सदस्यांना वाहनातून बळजबरीने बाहेर काढून सोबत नेल्याने अविश्वास बारगळला खरा मात्र यामुळे अगदी ग्रामीण भागातील राजकारण कोणत्या स्तराला गेले याचा प्रत्यय आला. दादागिरीवर उतरलेले कार्यकर्ते अन् हतबल पोलीस असे दृश्य यावेळी माजी मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे घनिष्ट समजले जाणारे आमदार संजय कुटे यांच्या मतदारसंघात पहावयास मिळाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१७ पैकी १३ सदस्यांनी सरपंच रामेश्वर आंबेलकर यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. यावर चर्चा करण्यासाठी आज, २३ ऑगस्ट रोजी तहसीलदार शितल सोलाट यांच्या अध्यक्षतेखाली सभा बोलावण्यात आली होती. अविश्वास प्रस्तावावर चर्चा होण्याआधीच सरपंच गटाच्या सदस्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर पोलिसांच्या साक्षीने राडा केला. विरोधी ग्रामपंचायत सदस्य आलेल्या क्रुझर गाडीवर हल्ला चढवत सदस्यांना धमकावले सरपंच गटांच्या तीन सदस्यांना जबरदस्तीने पळून नेल्याने दाखल करण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव बारगळला. विद्यमान सरपंच हे दुसऱ्या गटाकडून सदस्य म्हणून निवडून आल्यावर ह्या गटात सहभागी होऊन सरपंच झाले होते.

हेही वाचा >>>बुलढाणा: कांदा खरेदीचा निर्णय म्हणजे शुद्ध धुळफेक, रविकांत तुपकर यांचे टीकास्त्र

सुनगाव सरपंचाविरुद्ध १७ आगस्टता अविश्वास दाखल झाला त्यावेळी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र होते. मात्र अविश्वासावर चर्चेच्यावेळी काँग्रेसचे अथवा शिवसेनेचे कोणतेही पदाधिकारी ग्रामपंचायत सुनगाव कार्यालयासमोर उपस्थित नव्हते. सरपंच गटाचे जवळपास १०० महिला, पुरुष उपस्थित होते.

हेही वाचा >>>चोरट्यांचा धुमाकूळ; वाशीम शहरात एकाच रात्री चार चोरीच्या घटना

हतबल पोलीस?

पोलीस उपनिरीक्षक रंजना आवारे, नारायण सरकटे, सुभाष वाघोदे यांच्यासह कर्मचारी उमेश शेंगोकार, घट्टे, गाडे बंदोबस्तासाठी तैनात होते. सरपंच गटाच्या समर्थकांच्या दादागिरीसमोर पोलीस हतबल ठरल्याचे दिसून आले. ठाणेदार दिनेश झांबरे हे नंतर घटनास्थळी पोहोचले. एवढा पोलीस बंदोबस्त असूनही सरपंच गटाने सदस्यांचे पलायन केले. सदस्यांना धक्काबुक्की व मारहाणसुद्धा केली. त्यामुळे जनतेमध्ये पोलिसांप्रती तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: During the proposal on the sarpanch of sungaon gram panchayat workers protested in front of the police in the area buldhana scm 61 amy