नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी विधान भवन परिसरातील शिवसेना कार्यालयातून विधानसभेच्या दिशेने निघाले. दरम्यान, गर्दीत मुख्यमंत्र्यांसह त्यांच्यासोबत चालणारे चोपदार खाली पडले. एकनाथ शिंदेने लगेच हात देऊन त्यांना उचलून विचारणा केली. त्यानंतर चोपदाराचा हात पकडून ते कार्यालयाच्या बाहेर आले.
उपराजधानीत अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळच्या सत्रात विधानभवन परिसरातील त्यांच्या गटाच्या शिवसेना कार्यालयात आले. येथे त्यांच्यासोबत आमदारांची गर्दीही होती. दरम्यान, विधान भवन परिसरात मुख्यमंत्र्यांच्या सोबतीने राजदंड घेऊन चोपदारही चालत होता. या कार्यालयाचे मुख्यमंत्र्यांनी एक मिनिट निरीक्षण केले.
हेही वाचा: नागपूर: पहाटे तीन वाजताच्या सुमारास धावत्या बसमध्ये एकटी तरुणी झोपेत असताना झाले असे की…
त्यानंतर विधानसभेची वेळ झाल्याची बेल वाजताच शिंदे विधानसभेच्या दिशेने निघाले. दरम्यान, अचानक गर्दी विधानसभेच्या दिशेने जायला वळल्याने धक्का लागून चोपदार खाली पडले. हा प्रकार बघून शिंदे तेथे थांबले. त्यांनी हात देऊन त्यांना उचलून विचारणा केली. त्यानंतर चोपदाराचा हात पकडून कार्यालयाच्या बाहेर निघाले.