बुलढाणा : शेगावच्या गजानन महाराज संस्थान परिसरात आज ‘गण गण गणात बोते’च्या  बरोबरीने ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ चा जयघोष गुंजला! आज संस्थान व परिसरांमध्ये श्री दत्त जयंती विविध धार्मिक कार्यक्रमामुळे उत्साहन  साजरी करण्यात आली. गजानन महाराज संस्थानमध्ये दत्त जयंती साजरी करण्यात आली. आज, मंगळवारी सकाळी ४ ते ६ दरम्यान मनोज महाराज कुलकर्णी यांचे किर्तन रंगले. यानंतर उपस्थित भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

 गजानन महाराज मंदिरासमोरील दत्त अवधुत मंदिरात जयंती सोहळा साजरा करण्यात आला. दत्तात्रयांच्या मूर्तीवर शुभम उगले यांनी रंगीबेरंगी  पानाफुलांनी आकर्षक पूजा बांधली. मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली. सुधाकर उगले यांनी सात दिवस गुरुचरित्र पारायण केले. महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली.