स्वच्छता सर्वेक्षण अंतर्गत गेल्या काही वर्षात शहरावर अस्वच्छतेचा बसलेला डाग पुसून काढण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवले जात आहे. मात्र, शहरातील विविध भागात बांधकाम पाडल्यानंतर जागोजागी निर्माण झालेले मातीचे ढिगारे आणि रस्त्यावरील इतर कामांकडे दुर्लक्ष केल्यामुळे स्वच्छता व आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहे.

हेही वाचा- लग्नानंतर पंधराव्या दिवशीच ‘ती’ इमारतीवरून पडली, शरीरावर मारहाणीच्या खुणा, काय घडले?

Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
Balu Dhanorkar mother, Vatsala Dhanorkar claim,
खळबळजनक! खासदार बाळू धानोरकरांचा घातपात, आईच्या दाव्याने शंका कुशंका
80 lakh cash worth rs 17 lakh mephedrone seized in pimpri chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये ८० लाखांची रोकड, १७ लाखांचे मेफेड्रोन जप्त
Nagpur pollution latest news
दिवाळीत फटाके फुटले तरी प्रदूषण कमी, मात्र दिवाळी आटोपताच उपराजधानीत…..
illegal godown of mandap materials on reserved plot for educational facility in dombivli
डोंबिवलीत पाथर्ली येथे पालिकेच्या शैक्षणिक सुविधेच्या आरक्षित भूखंडावर मंडप साहित्याचे बेकायदा गोदाम

स्वच्छतेमध्ये शहर माघारल्यानंतर महापालिका प्रशासनाने यावेळी स्वच्छतेबाबत विविध उपक्रम राबवणे सुरू केले आहे. त्यात शहरातील विविध भागातील भिंती रंगवल्या जात आहे. प्रमुख भागातील चौकांचे सौंदर्यीकरण केले जात आहे. स्वच्छ मोहल्ला स्पर्धा आयोजित केली आहे. घरोघरी निर्माण झालेला कचऱ्याची विल्हेवाट लागावी यासाठी प्रयत्न केले जात आहे. मात्र, रस्त्यावरील कचरा, अनेक भागात बांधकाम पाडल्यानंतर निर्माण झालेल्या मातीचे ढिगाऱ्यांकडे मात्र महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.

हेही वाचा- “संकटात आम्ही संजय राठोड यांच्यासोबत होतो”, मुख्यमंत्री शिंदेंचे विधान; म्हणाले, “पूजा चव्हाण प्रकरणात…”

गेल्या महिन्यात महालातील बुधवार बाजारासह केळीबाग मार्गावरील दुकाने तोडण्यात आली. बाजारातील सर्वच छोटी दुकान तोडण्यात आली. मात्र, बाजारात निर्माण झालेले मातीचे ढिगारे तसेच पडून आहे. बाजारातील दुकाने आता केळीबाग मार्गावर आली आहे. त्यात या मार्गावर सिमेंट रस्त्याची कामे सुरू आहे. या मार्गावरील अनेक दुकानांसमोर मातीचे ढिगारे आहे. अशीच परिस्थिती शहरातील अन्य भागात आहे. गोकुळपेठ, धरमपेठ परिसरात अनेक अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. मात्र, त्या ठिकाणी मलबा पडून आहेत. सक्करदरा बुधवार बाजारात सुद्धा तीच परिस्थिती आहे. या ठिकाणी बाजार सोडून फुटपाथवर आणि रस्त्यावर भाजी विक्रेत्यांची दुकाने थाटली आहे. त्यामुळे या ठिकाणी सायंकाळनंतर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होते. ते दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत उचलले जात नाही.

हेही वाचा- “कोश्यारी यांनी राज्यपाल म्हणून घेतलेल्या निर्णयाची चौकशी व्हावी”; शरद पवार यांचे मत

महापालिका आयुक्तांनी शहरात रस्त्यांच्या कडेला पडलेले मातीचे ढिगारे तात्काळ हटवा, असे आदेश दिले आहेत. तरीही कुठलीच कारवाई होत नाही. शहरातील अनेक भागातील फुटपाथ चांगले करण्यात आले आहे. मात्र, पदपथांवरील गट्टू उखडले आहे. शहरातील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे पूर्ण करण्याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. परंतु, ज्या ठिकाणचे काम पूर्ण झाले आहे त्या ठिकाणी अनावश्यक पडलेले मातीचे ढिगारे, पेव्हर ब्लॉक, गट्टचे ढीग, फुटपाथच्या उखडलेल्या गट्टु जशाच्या तशा आहेत.

सिव्हिल लाईन भागासह धरमपेठ, गोकुळपेठ, प्रतापनगर, अंबाझरी, रेशीमबाग, वर्धा रोड येथील फुटपाथवरील गट्टू उखडले आहेत. डांबरी रस्त्याची कामे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असून रस्ते उखडलेले आहे. अनेक ठिकाणी गटारावरील झाकणेही गायब झाली आहेत. चेंबरजवळील फुटपाथच्या गट्टे उखडले असून काही भागात गटाराची झाकणेही तुटली आहे. त्यामुळे गटारातील घाण पाणी बाहेर येत आहे.

हेही वाचा- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर; चर्चा मात्र उच्च न्यायालयाने दोनदा बजावलेल्या नोटीसची

शहराचा क्रमांक पुन्हा घसरणार?

मध्य नागपुरातील जागनाथ बुधवारी, मस्कासाथ, इतवारी या भागात सिमेंट रस्ते बांधण्यात आले. मात्र, फुटपाथची कामे अर्धवट स्थितीत असून या भागात अनेक ठिकाणी बांधकाम साहित्य रस्त्याच्या कडेला पडून आहे. शहरात लवकरच स्वच्छ सर्वेक्षण होणार आहे. त्या दृष्टीने स्वच्छतेच्या दृष्टीने कामाला गती देण्यात आली नाही आणि नागरिकांनी स्वच्छतेबाबत मानसिकता बदलली नाही तर यावर्षी स्वच्छतामध्ये शहराचा क्रमांक