यवतमाळ : मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात आज गुरूवारी सकाळी ६ वाजून ८ मिनिटांनी व त्यानंतर ६ वाजून १९ मिनिटांनी अनुक्रमे ४.५ रिस्टर स्केल व ३.६ रिस्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसले. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड खंड एकमधील काही भागात या भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भारत सरकारच्या पृथ्वी मंत्रालयाच्या राष्ट्रीय भुकंपशास्त्र केंद्राच्या संकेतस्थळावर या भूकंपाची नोंद घेण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> आमदार अमोल मिटकरी म्हणतात,‘ भाजपने हवेत राहू नये…’ अकोल्यात महायुतीतील वाद चव्हाट्यावर

उमरखेड तालुक्यात काही भागात धक्के जाणवल्याच्या वृत्तास प्रशासनाने दुजोरा दिला. आज सकाळी सहा ते साडेसहा वाजताच्या सुमारास उमरखेड तालुक्यातील उमरखेड खंड-१ मधील काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता अधिक नसली तरी जमीन हादरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. अनेकांनी घरातून बाहेर पडत मोकळ्या जागेत आसरा घेतला. तालुक्यातील या धक्यांस्ची नोंद प्रशासनाने घेतली असून कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरून जावू नये, सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Earthquakes in umarkhed earthquake of magnitude 4 5 strikes maharashtra s hingoli nrp 78 zws