नागपूर : मागील चार वर्षांत महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉजिटर्स (एमपीआयडी) कायद्याच्या अंतर्गत नागपूर शहरात आर्थिक गुन्हे शाखेने २६ गुन्ह्यांची नोंद केली. या गुन्ह्यामधील फसवणुकीची रक्कम सुमारे ९० कोटींच्या घरात होती. मात्र, यापैकी एक रुपया देखील पीडितांना परत प्राप्त झाला नाही. नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयातर्फे माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत ही माहिती समोर आली आहे.

उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय तसेच ग्राहक न्यायालयात फसवणुकीच्या अनेक प्रकरणांवर सुनावणी सुरू आहे. अशाप्रकारच्या प्रकरणांमध्ये पीडितांच्यावतीने बाजू मांडणाऱ्या अॅड. सुदीप बदाना यांनी पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे याबाबत माहितीचा अर्ज केला होता. ‘एमपीआयडी’ कायद्यांतर्गत किती गुन्हे दाखल झाले, फसवणुकीची एकूण रक्कम किती तसेच पीडितांना किती परतावा दिला गेला, याबाबत अॅड. बदाना यांनी विचारणा केली होती.

Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
india railway viral news Husband-Wife Fight
नवरा-बायकोतील भांडण अन् रेल्वेचे तीन कोटींचे नुकसान! OK मुळे चुकीच्या स्थानकावर पोहोचली ट्रेन; नेमकं घडलं काय? वाचा…
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
fraud of 19 lakh with youth by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची १९ लाखांची फसवणूक
Terrifying Railway accident of railway employee due to train driver at barauni junction in bihar video viral
बापरे! चालकाच्या चुकीमुळे घडला मोठा अनर्थ, ट्रेन सुरू करताच झाला रेल्वे कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडल? पाहा VIDEO

हेही वाचा >>> राज्यात पाच वीज केंद्रातील सहा संच बंद, मागणी व पुरवठ्यातील तफावत वाढू लागली

पोलीस आयुक्त कार्यालयाच्यावतीने दिलेल्या माहितीनुसार, २०२० मध्ये एमपीआयडी अंतर्गत ११ गुन्ह्यांची नोंद झाली. यामध्ये फसवणुकीची रक्कम ४६ कोटी होती. २०२१ मध्ये केवळ चार गुन्ह्यांची नोंद झाली, ज्यामध्ये फसवणुकीची रक्कम सुमारे ९ कोटी होती. यानंतर २०२२ आणि २०२३ मध्ये प्रत्येकी ५ गुन्हे नोंदवले गेले. दोन्ही वर्षे फसवणुकीची रक्कम १७ कोटी रुपयांच्या जवळपास होती. २०२४ मध्ये आतापर्यंत केवळ एका गुन्ह्याची नोंद झाली आहे. २०२० ते २०२४ या चार वर्षांच्या कालावधीत एकूण झालेल्या ९० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या रकमेपैकी एकही रुपया परत मिळाला नाही. पोलिसांनी दावा केला आहे की, तपासादरम्यान आरोपींची मालमत्ता गोठवण्यात आली, मात्र प्रकरण न्यायालयात असल्याने फिर्यादींना रक्कम परत केली नाही. न्यायालयाच्या आदेशानंतरच पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी माहितीच्या अधिकारात दिली.

र्ष प्रकरणे फसवणुकीची रक्कम

२०२० ११ ४६.८४ कोटी

२०२१ ०४ ९.५२ कोटी

२०२२ ०५ १७.१७ कोटी

२०२३ ०५ १६.३२ कोटी

२०२४ ०१ तपास सुरू