नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या महाविद्यालयावर शुक्रवारी धाड टाकल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शनिवारी त्यांच्या वर्धा मार्गावर असलेल्या ट्रव्होटेल हॉटेलवरही छापा टाकला. यादरम्यान अधिकाऱ्यांनी हॉटेलच्या व्यवस्थापकाला चौकशीसाठी नेल्याची माहिती सूत्रांनी दिली.  देशमुख यांनी दिल्ली येथील बोगस कंपन्यांच्या माध्यमातून आपल्या श्री शिक्षण संस्थेत सव्वाचार कोटी रुपये वळवल्याच्या माहितीच्या आधारे ईडीने शुक्रवारी ते अध्यक्ष असलेल्या नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) महाविद्यालयावर छापे टाकले. आज शनिवारी दुपारी ईडीचा ताफा थेट वर्धा मार्गावर असलेल्या देशमुख यांच्या हॉटेलात धडकला. ट्रव्होटेल हॉटेलमध्ये जवळपास दोन तास त्यांनी तपास केला. त्यानंतर हॉटेलच्या व्यवस्थापकाला चौकशीसाठी आपल्यासोबत नेल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली. देशमुख यांना चार वेळा ईडीने समन्स बजावले आहेत. मात्र देशमुख यांनी त्याची दखल घेतली नाही.

Story img Loader