नागपूर: ऑनलाइन जुगारासंदर्भातील महादेव अ‍ॅप आणि कुख्यात दाऊद इब्राहिमशी संबंध असलेल्या कंपनीला वित्तीत साहाय्य करणाऱ्या ‘एडलवाईस’ कंपनीमध्ये झालेल्या व्यवहाराची येत्या दोन महिन्यांत चौकशी करण्यात येईल. तसेच यात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत केली.

तसेच प्रथितयश व्यक्तींनी केवळ पैसे मिळतात म्हणून ऑनलाइन जुगाराच्या जाहिराती करून लोकांना जुगाराचे व्यसन लावणाऱ्या जाहिराती करू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले.

mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”
Afghan national behind Iran's plot to assassinate Donald Trump
ट्रम्प यांच्या हत्येचा कट इराणनेच रचला होता? या संदर्भात अटक झालेला फरहाद शकेरी कोण आहे?
bombay hc reject builder bail over illegal housing projects
बेकायदा गृहप्रकल्प राबवणाऱ्यांवर कारवाई गरजेची; विकासकांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाची टिप्पणी
Mumbai High Court Verdict On Marriage Cruelty.
सुनेला टीव्ही पाहू न देणे ही क्रूरता? मुंबई उच्च न्यायालयातील खटला २० वर्षांनी निकाली
Donald Trumps legal cases
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गुन्हेगारी खटल्यांचे काय होणार? त्यांची निर्दोष मुक्तता होणार?

महादेव अ‍ॅप ऑनलाइन जुगाराबाबत आशीष शेलार यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत  पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, अ‍ॅड. वर्षां गायकवाड, बच्चू कडू, आदित्य ठाकरे आदी सदस्यांनी ऑनलाइन जुगाराला आळा घालण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी केली.

हेही वाचा >>> विधानसभेच्या पत्रकार गॅलरीत घोषणाबाजी, काय घडले?

महादेव अ‍ॅपच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात ऑनलाइन अनधिकृत जुगार चालविण्यासाठी रवी उत्पल आणि त्याच्या सहकाऱ्यांनी वेगवेगळय़ा ६७ संकेतस्थळ आणि अ‍ॅपची निर्मिती केली. या प्रत्येक संकेतस्थळ किंवा अ‍ॅपचे मालक वेगळे असून त्याची ८०:२० अशी भागीदारी होती. या अ‍ॅपची नोंदणी दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला येथील कराकासो शहरात करण्यात आली असून हा सगळा जुगार दुबईतून चालविला जात होता. यातील मुख्य आरोपी उत्पल याला अटक केली असून त्याचा अधिक तपास अंमलबजावणी संचालनालय करीत असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. 

‘धर्मातर केलेल्या अदिवासींना सरकारी लाभ नको’

धर्मातरित आदिवासींमुळे मूळ आदिवासींवर अन्याय होतो. त्यांना त्यांचे  हक्क मिळत नाहीत. सरकारला भेदाभेद करायचा नाही. पण, मूळ आदिवासींच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी धोरण ठरविण्यासाठी निवृत्त कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल. या समितीचा अहवाल सभागृहासमोर ठेवून अंतिम धोरण निश्चित केले जाईल, अशी घोषणा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली.  सदस्य निरंजन डावखरे यांनी आदिवासींचे प्रलोभन दाखवून धर्मातर केले जाते. या धर्मातरांचे प्रमाण वाढले आहे. असे धर्मातर करणाऱ्यांना कोणताही सरकारी लाभ मिळू नये, संबंधितांना अनुसूचित जमाती अंतर्गत मिळणारे आरक्षण मिळू नये. धर्मातर करणाऱ्या बोगस अधिवासींमुळे मूळ आदिवासी जनतेवर अन्याय होत आहे. या बाबत सरकार काय भूमिका घेणार आहे, असा प्रश्न उपस्थित केला.

हेही वाचा >>> जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा; म्हणाले…

महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणात साहिल खानसह चौघांना समन्स

मुंबई : बेकायदा जुगाराद्वारे १५ हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी महादेव बुक बेटिंग अ‍ॅपचा प्रवर्तक सौरभ चंद्राकर, रवी उप्पल, शुभम सोनी आणि इतर २९ जणांविरोधात दाखल गुन्ह्यांप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अभिनेता साहिल खानसह चौघांना समन्स पाठवले आहेत. याप्रकरणी साहिल खानने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती, पण त्याचा अर्ज फेटाळण्यात आला होता.   गुरुवारी आरोपी अमित शर्माला समन्स बजावण्यात आले, पण तो हजर झाला नाही. आता गुन्हे शाखेने अभिनेता साहिल खान, त्याचा भाऊ सॅम आणि दुसरा आरोपी हितेश खुशलानी यांना शुक्रवारी चौकशीत सहभागी होण्यासाठी समन्स बजावले आहे.