चंद्रपूर: राज्यात गिधाडांची संख्या वाढण्याच्या दृष्टीने तसेच त्यांचे प्रभावी संरक्षण व संवर्धन व्हावे या दृष्टीने बीएनएचएस या संस्थेच्या सहकार्याने तातडीने योजना तयार करावी तसेच जंगली म्हैस आणि लांडगा यांचेही संवर्धन करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करा असे निर्देश राज्य वन्यजीव मंडळाचे उपाध्यक्ष, वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे राज्य वन्यजीव मंडळाची २२ वी बैठक सोमवारी पार पाडली. यावेळी सुधीर मुनगंटीवार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभुरर्णीकर, वन्यजीव मंडळाचे सदस्य सचिव तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महीप गुप्ता, आदी यावेळी उपस्थित होते. मुनगंटीवार यांनी आभासी पद्धतीने बैठकीला उपस्थित राहून प्रत्येक विषयावर सदस्यांसोबत चर्चा केली व आवश्यक सूचना केल्या.

हेही वाचा – चंद्रपूर : सरपंचाचा मनमानी कारभार, ग्रामस्थांनी कोलारा ग्रामपंचायतीला ठोकले कुलूप; बरखास्तीची मागणी

सदर बैठकीत पाणीपुरवठ्याचे प्रस्ताव, भूमिगत ओडीएफ मोबईल टॉवर उभारण्याचे प्रस्ताव, राष्ट्रीय महामार्गाचे प्रस्ताव, भुयारी मार्गाचा प्रस्ताव, मंदीर पायऱ्या दुरुस्तीचा प्रस्ताव, विज वाहिनीचे प्रस्ताव, नैसर्गिक गॅस पाईप लाईनचा प्रस्ताव, पाटबंधारे नुतनीकरणाचा प्रस्ताव, खाणीचे प्रस्ताव अश्या ३१ विकास प्रस्तावांना मान्यता प्रदान करण्यात आली.

वन्यजीव मान्यतेची प्रक्रिया जलद गतीने पार पाडण्यासाठी उपाध्यक्ष तथा मंत्री (वने) यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची स्थायी समिती स्थापन करण्यास मंडळाने मान्यता प्रदान केली. यामुळे प्रस्ताव जलद गतीने निकाली काढण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा – नुकसानीमुळे नागपूरकर हताश आणि ‘विकास पुरुष’ गडकरी !

जिल्हा नागपूर, ता. पारशिवनी येथिल मौजे सालेघाट, या गावाचा अंतर्भाव करून मानसिंग देव विस्तारीत अभयारण्य घोषित करण्याबाबत मंडळाने मान्यता दिली आहे. राज्यात गिधाडांची संख्या वाढण्याच्या दृष्टीने तसेच त्यांचे प्रभावी संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने बीएनएचएस या संस्थेच्या सहकार्याने योजना तयार करणे, जंगली म्हैस आणि लांडगा यांचे संवर्धन करण्याबाबत कार्यवाही करण्यासाठी मंडळाने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Effectively protect and conserve vultures to increase their population directed by sudhir mungantiwar rsj 74 ssb
Show comments