लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यवतमाळ : जालना येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून बेछूट लाठीचार्जच्या घटनेचे तीव्र पडसाद आज शनिवारी यवतमाळमध्ये उमटले. सर्व शाखेय कुणबी समाज व मराठा समाज संघटनांच्या वतीने शिवतीर्थावरून मोर्चा काढण्यात आला. बसस्थानक चौकात मोर्चेकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करीत अचानक चक्काजाम आंदोलन पुकारले. या ठिकाणी टायर पेटविण्याचाही प्रयत्न झाला. तर जिल्हाधिकारी कार्यालयापुढे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळताना पोलिसांसोबत आंदोलकांची झटापट झाली.

पोलिसांनी महिला, वृद्ध, मुलं यांच्यावर कुठलाही विचार न करता हल्ला चढविला त्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत, असा आरोप करीत त्यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी आंदोलकांनी केली. लाठीहल्ला करण्याचा आदेश देणारा सत्तेतील खरा जनरल डायर कोण, याची सखोल चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली.

आणखी वाचा-बुलढाणा: मलकापुरात सकल मराठा समाजाचा रास्ता रोको

आंदोलनात नानाभाऊ गाडबैले, बिपीन चौधरी आदींसह मराठा समाजाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Effigies of the chief minister and both the deputy chief ministers were burnt at yavatmal nrp 78 mrj