नागपूर : पुणे येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील खेळाडूंना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नामुळे रेल्वेच्या दोन विशेष बोगी मिळाल्या. त्यामुळे त्यांचा नागपूर-पुणे प्रवास सुखमय झाला. पुण्यातील क्रीडा स्पर्धेसाठी १३० दिव्यांग खेळाडूचे पथक जाणार होते. तयारीसाठी त्यांच्याकडे केवळ १२ दिवस शिल्लक होते. इतक्या कमी वेळेत रेल्वे आरक्षण मिळणे अवघड होते. त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधून सहकार्य करण्याची विनंती केली. गडकरी यांनी लगेच रेल्वे मंत्र्यांशी संपर्क साधला व खेळाडूंसाठी दोन बोगी उपलब्ध करून दिल्या. नागपूरच्या खेळाडूंनी या स्पर्धेत ४७ सुवर्ण, २२ कांस्य आणि २७ रजत पदकांसह एकूण ९६ पदके जिंकली.
नागपूर : नितीन गडकरी यांच्या प्रयत्नामुळे दिव्यांग खेळाडूंना विशेष रेल्वे बोगी
पुणे येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील खेळाडूंना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नामुळे रेल्वेच्या दोन विशेष बोगी मिळाल्या.
Written by लोकसत्ता टीम
नागपूर
First published on: 17-02-2023 at 17:49 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Efforts of nitin gadkari special railway coaches for disabled athletes cwb 76 ysh