भंडारा : जवाहर नगर आयुध निर्माण कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात ८ जणांचा मृत्यू झाला होता. तीन जखमींवर नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या जखमींपैकी एकाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. महिनाभर मृत्यूशी झुंज देणाऱ्या जयदीप बॅनर्जी वय ४५ वर्षे, यांनी आज रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. जवाहरनगरच्या आयुध निर्माण करणाऱ्या कारखान्यामध्ये एलटीपीई २३ (लो टेंपरेचर प्लास्टिक एक्यूपमेंट) विभागात भीषण स्फोट झाल्याची घटना २४ जानेवारी रोजी सकाळी घडली होती. हा विभाग अती संवेदनशील असल्याने रोजच्या प्रमाणे अत्यंत सावधगिरीने सर्वजण आपले काम करत होते. मात्र दोनच तासात होत्याचे नव्हते झाले.

एलपीटीई २३ सेक्टरमध्ये अचानक जोरदार स्फोट झाला. या स्फोटामुळे जमिनीत मोठा खड्डा पडला आणि एलपीटीईची अख्खी इमारत एका क्षणात या खड्ड्यात सामावली. या सेक्टरमध्ये काम करणारे कामगार आणि कर्मचारी मलब्यखाली दबले गेले. या दुर्दैवी घटनेत ८ कर्मचाऱ्यांना त्यांचे प्राण गमवावे लागले होते. या घटनेमुळे जिल्हा हादरून गेला होता. या स्फोटात ८ जणांना प्राण गमवावे लागले होते. स्फोटातून तीन जण बचावले होते. त्यांच्यावर नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. एक महिना मृत्यूशी झुंज देत रुग्णालयात जयदीप बॅनर्जी यांनी अखेरचा श्वास घेतला.

या घटनेत चंद्रशेखर गोस्वामी ५९ वर्षे, मनोज मेश्राम ५५ वर्षे, अजय नागदेवे ५१ वर्षे,अंकित बारई २० वर्षे , लक्ष्मण केलवडे ३८, अभिषेक चौरसिया वय ३५, धर्मा रंगारी वय ३५ वर्ष ,संजय कारेमोरे ३२ यांचा मृत्यू झाला होता तर एन पी वंजारी ५५ वर्षे, संजय राऊत ५१ वर्ष , राजेश बडवाईक ३३ वर्षे, सुनील कुमार यादव २४ वर्षे, जयदीप बॅनर्जी ४२ वर्षे हे जखमी होते. यांपैकी सुनील कुमार यादव, जयदीप बॅनर्जी आणि राजेश बडवाईक हे या घटनेत गंभीर जखमी झाल्यामुळे यांच्यावर नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

Story img Loader