लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चंद्रपूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम शनिवारी लागलेल्या निकालाने संपुष्टात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघापैकी चार मतदार संघातून लाडक्या बहिणींनी निवडणुकीत नशीब आजमावले. मात्र,बल्लारपूर विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार डॉ. अभिलाषा गावतुरे ( बेहरे ) यांच्या शिवाय एकाही लाडक्या बहिणीला निवडणुकीत प्रभाव दाखवता आला नाही.

चंद्रपूर जिल्ह्यातील चार वेगवेगळ्या मतदार संघातून ८ लाडक्या बहिणींना मतदारांनी नाकारल्याचे चित्र निवडणूक निकालातून शनिवारी स्पष्ट झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा, वरोरा, चंद्रपूर, बल्लारपूर, चिमूर व ब्रम्हपुरी असे एकूण ६ विधानसभा मतदार संघ आहेत. यामध्ये एकूण ९४ उमेदवारांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दरम्यान निवडून येण्यासाठी प्रयत्नाची शिकस्त केली.यामध्ये महिला उमेदवार देखील मागे नव्हत्या. लाडकी बहीण म्हणून मतदार स्विकारतील ही आशा होती.

आणखी वाचा-स्वयंसेवक ते आमदार; गडचिरोलीत डॉ. मिलिंद नरोटे यांच्या विजयाने भाजपमध्ये नवचैतन्य

मात्र,लाडक्या बहिणीच्या पदरी निवडणुकीत निराशा हाती आली. विशेष म्हणजे उंचीने अडीच फुट असलेल्या तारा महादेव काळे ही लाडकी बहीण तब्बल सातव्यांदा विधानसभा सार्वत्रिक निवडणूक लढली.राजुरा विधानसभा मतदार संघात एकूण १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यामध्ये चित्रलेखा कालिदास धंदरे यांना ६४0 मते, प्रिया बंडू खाडे यांना ५९६ मते,तर किरण गंगाधर गेडाम यांना ५८७ मतावर समाधान मानावे लागले.

बल्लारपूर विधानसभा मतदार संघातील डॉ. अभिलाषा गावतुरे ( बेहरे ) यांना एकूण मतांपैकी २0 हजार ६४६ मते मिळाली. छाया बंडू गावतुरे यांना २८४ मते, तर निशा धोंगडे यांना २२७ मते मिळाल्याने पदरी निराशा आली आहे. या मतदार संघात एकूण २0 उमेदवारांनी नशिब आजमावले. चंद्रपूर विधानसभा मतदार संघात एकूण १६ उमेदवारांनी निवडणुकीत दंड थोपटले होते. यामध्ये केवळ नभा संदीप वाघमारे याच एकमेव महिला निवडणूक लढल्या. त्यांना ४६४ मतावर समाधान मानावे लागले. चिमूर आणि ब्रम्हपुरी विधानसभा मतदार संघात मात्र,लाडक्या बहिणीने निवडणूक लढण्यास स्वारस्य दाखवले नाही.

आणखी वाचा-पश्चिम विदर्भात महाविकास आघाडीला ‘वंचित’चा नऊ जागी अपशकून…

तारा काळे यांच्या हिंमतीला दाद

विधानसभा सभा निवडणुकीत सर्वात कमी उंचीच्या उमेदवार म्हणून तारा महादेव काळे यांची गणना आहे. त्यांची उंची केवळ अडीच,तीन फुट आहे. मात्र, त्या सलग सातव्यांदा या वर्षी विधानसभा निवडणुकीला सामोरे गेल्या.भद्रावती – वरोरा विधानसभा मतदार संघातून त्या सहा सार्वत्रिक निवडणूक लढल्या. एकदा त्यांनी बल्लारपूर विधानसभा मतदार संघातून नशिब आजमावले. मात्र,त्यांच्या नशिबी सातत्याने पराभव येत आहे. पण त्यांनी हिंमत हारली नाही.

भद्रावती मतदार संघामध्ये त्यांना १९९५ च्या निवडणुकीत ५६१ मते,१९९९ मध्ये ५५२ मते,२००४ मध्ये ७४७ मते, २००९मध्ये ५२५ मते, २०१४ मध्ये ४२८ मते ,तर बल्लारपूर विधानसभा मतदार संघात २०१९ च्या निवडणुकीत ४0५ मते मिळाल्याचा इतिहास आहे. आता त्यांना वरोरा मतदार संघामध्ये ४६७ मतावर समाधान करावे लागले आहे. तारा महादेव काळे यांच्या निवडणूक लढण्याच्या हिंमतीला एका अर्थाने दाद द्यावी लागते.