नागपूर : मेडिकल रुग्णालयाशी संलग्नित सुपरस्पेशालिटी रुग्णालयात आठ दिवसांपूर्वी कोब्रा साप निघाल्याची घटना घडली असतानाच आता प्रादेशिक मनोरुग्णालयातही आठ फूट लांबीचा साप निघाला. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. या घटनेमुळे रुग्णांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रादेशिक मनोरुग्णालयातील सूत्रानुसार आठवडाभरातील ही साप निघण्याची दुसरी घटना आहे. पहिल्या घटनेत येथे सापाची पिल्ले आढळली होती. तर मंगळवारी ८ फूट लांबीचा साप निघाला. अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ हा साप मनोरुग्णालयाच्या आवारात होता. या सापाला बघून कर्मचारी-अधिकाऱ्यांत खळबळ उडाली. तातडीने सर्पमित्राला सूचना देण्यात आली. सर्पमित्राने रुग्णालयात येऊन सापाला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडले. मनोरुग्णालयात सुमारे ५३५ रुग्ण आहेत. विशेष म्हणजे अनेक वॉर्डांमध्ये मनोरुग्ण खाली बसतात, हातवारे करून खेळत असतात.

हेही वाचा >>>नागपूर: चारित्र्यावर संशय; पतीने केला पत्नीचा खून

हेही वाचा >>>प्रफुल पटेलांच्या गृह जिल्हा गोंदियात राष्ट्रवादी दुभंगली; २८ जुलैला शरद पवार गटाचा मेळावा

दुपारी साप निघाल्यामुळे तो दिसला. परंतु, रात्री अपरात्री साप निघाल्यास धोका होण्याची भीती आहे. मनोरुग्णालयाच्या आवारात झुडपी जंगल आहे. मोठे वृक्ष आहेत. यामुळे येथे सरपटणारे प्राणी दिसतात. मनोरुग्णालयाच्या वॉर्डात साप शिरू नये यासाठी प्रशासनाने उपाययोजना केल्याची माहिती प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीकांत कोरडे यांनी केली आहे.