वर्धा: सणांचा राजा म्हटल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यात यंदा एक दुर्मिळ योग जुळून आला आहे. हा महिना भगवान शंकराचा समजला जात असतो. दर तीन वर्षांनी येणारा अधिक मास आता जुलै महिन्यात आला आहे. म्हणून अधिक श्रावण व नीज श्रावण असे दोन महिने श्रावण चालणार आहे.
अनेक भाविक श्रावण सोमवार पाळून उपवास करतात. आता दोन महिने श्रावण राहणार असल्याने सोमवार पण आठ येत आहेत. पहिला सोमवार २४ जुलै तर पुढे ३१ जुलै, ७ ऑगस्ट, १४ ऑगस्ट, २१ ऑगस्ट, २८ ऑगस्ट, ४ सप्टेंबर तर आठवा सोमवार ११ सप्टेंबरला आहे.
हेही वाचा… बुलढाणा : गजानन महाराज पालखी शेगावात परतली, खामगाव पायदळ वारीत हजारो भाविक सहभागी
हा योग तब्बल १९ वर्षानंतर आल्याचे पंचांग अभ्यासक सांगतात. श्रावण सोमवारी भगवान शंकरास बेल अर्पण करून उपवास धरला जातो.