नागपूर : वाघांचा मृत्युदर ५० टक्क्यांनी कमी झाला म्हणून आनंद साजरा करणाऱ्या राज्यात गेल्या १९ दिवसात तब्बल आठ वाघांचा मृत्यू झाला. हे सर्वच मृत्यू संशयास्पद आहेत, पण कोणत्याही अधिकाऱ्याला त्यासाठी जबाबदार धरण्यात आले नाही. त्यामुळे वनखाते खरोखरच वाघांच्या संरक्षण व संवर्धनाविषयी गंभीर आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.राज्यात आतापर्यंत झालेले वाघांचे मृत्यू भविष्यात वाघांना असणारा धोका दर्शवणारे आहेत. वाघांचे तीन तुकडे करून जंगलात फेकल्यानंतरही वनाधिकाऱ्यांना माहिती होत नाही. वाघाचा मृतदेह कुजतपर्यंत त्यांना वाघाचा मृत्यू झाला हे कळत नाही.

शिकारी वाघाची शिकार करून १२ नखे आणि दात काढून नेतात, पण त्याची साधी कुणकुण लागत नाही. वाघिणीने बछडे उपासमारीने मरतात, त्यांची आई अजून सापडलेली नाही. वाघ नाल्याजवळ मृतावस्थेत पडलेला असूनही ते माहिती होत नाही. यातील दोन घटना स्पष्टपणे शिकारीकडे बोट दाखवणाऱ्या आहेत. या शिकारी स्थानिकांना हाताशी घेऊन बहेलिया शिकारी टोळ्यांनी घडवून आणल्या असतील तर संपूर्ण राज्यासाठी ती धोक्याची घंटा आहे.

gondia tiger latest news in marathi
वाघाच्या बछड्याच्या मृत्यूचे खरे कारण आले समोर, गोंदिया वन विभागाच्या…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
tiger killed laborer harvesting bamboo in Ballarpur forest
चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात मजूर ठार; मृतदेहाजवळ सहा तास ठिय्या…
gondia tiger death loksatta
गोंदिया : ‘टी १४ वाघिनी’च्या बछड्याच्या मृत्यू, ‘इन्फेक्शन’, निष्काळजीपणा की…
Makar Sankranti motorcyclist died after nylon manja got stuck in his neck
नाशिकमध्ये नायलाॅन मांजामुळे युवकाचा मृत्यू
Tiger death , Kohka-Bhanpur route, tiger gondia ,
राज्यात वाघांच्या मृत्यूचे सत्र! कॉरिडॉरमध्ये वाघाचा मृत्यू
avian flu transmission to humans
विश्लेषण : ‘एव्हियन इन्फ्लुएंझा’ (एच५एन१) माणसांसह वाघांनाही धोकादायक? 
Maharashtra tiger deaths
Tiger Deaths : राज्यात १० दिवसांत पाच वाघ मृत्युमुखी…

हेही वाचा…‘सोशल क्लब’च्या नावावर पाटणबोरीत जुगार अड्डे !

१) २ जानेवारी २०२५ – ब्रम्हपुरी वनविभागात सिंदेवाहीजवळील लाडबोरी शिवारात नाल्याजवळ वाघाचा मृतदेह आढळला.

२) ६ जानेवारी २०२५ – भंडारा जिल्ह्यातील तुमसर वनपरिक्षेत्रात पाचरा येथे वाघाचे तीन तुकडे करून फेकण्यात आले.

३) ७ जानेवारी २०२५ – यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनविभागाअंतर्गत उकणी कोळसाखाण परिसरात वाघाचा अर्धवट कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला.

४) ८ जानेवारी २०२५ – नागपूर जिल्ह्यातील देवलापार वनपरिक्षेत्रात वाघिणीच्या बछड्याचा मृतदेह आढळला

५) ९ जानेवारी २०२५ – ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पातील मूल बफर क्षेत्रात वाघिणीच्या बछड्याचा मृतदेह आढळला.

६) १४ जानेवारी २०२५ गोंदिया वनपरिक्षेत्रामधील कोहका-भानपूर परिसरात वाघाचा मृतदेह आढळला.

७) १५ जानेवारी २०२५ – नागपूर जिल्ह्यातील देवलापार वनपरिक्षेत्रात नवेगाव नियतक्षेत्रातील कक्ष क्र. ४८७ मध्ये वाघाच्या बछड्याचा कुजलेला मृतदेह आढळला.

८) १९ जानेवारी २०२५ – बल्लारशा – गोंदिया रेल्वे मार्गावर सिंदेवाही-आलेवाही जवळ रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाला.

वर्ष – वाघांचे मृत्यू

२०२० – १०६

२०२१ – १२७

२०२२ – १२१

२०२३ – १७८

२०२४ – ९९

१ ते १९ जानेवारी २०२५ – ०८

“वाघांचे मृत्यू किती या आकडेवारी पेक्षाही वाघांच्या मृत्यूमागच्या कारणांचा शोध घेणे आवश्यक आहे. या आठ घटनांमध्ये दोन घटना शिकारीच्या आहेत आणि ते गंभीर आहे. त्यामुळे या शिकारीमागे स्थानिक की बहेलिया आहेत, जर बहेलिया असतील तर संपूर्ण राज्यासाठी ती धोक्याची घंटा आहे. त्यामुळे तसा “अलर्ट” संपूर्ण राज्याला द्यावा लागेल.”
-किशोर रिठे, संचालक, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी

“व्याघ्रकेंद्रित पर्यटनावर वनखात्याचा भर वाढत आहे आणि त्यासाठी राजकीय नेतृत्व कारणीभूत आहे. वन्यजीव विभाग व प्रादेशिक विभागाच्या अधिकाऱ्यांवर असलेल्या दबावामुळे अनेक अधिकारी इच्छा असूनही वन्यजीव व्यवस्थापनावर काम करू शकत नाही. राजकीय नेतृत्व वाघ-माणूस संघर्ष झाला तर वाघाला जेरबंद करतात. वनखात्याची वाहने जाळतात, अधिकाऱ्यांना शिव्या घालतात. त्यामुळे खात्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्ची होत आहे. ” कुंदन हाते, माजी सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ

हेही वाचा…प्रियकराला भेटायला आलेल्या अल्पवयीन प्रेयसीची ‘अधुरी प्रेम कहाणी’

काय म्हणाले होते गणेश नाईक

वनमंत्री गणेश नाईक यांनी अलीकडेच यासंदर्भात चिंता व्यक्त केली होती. वाघांचा माणसाशी होणारा संघर्ष टाळायचा असेल तर आधी वाघ बाहेर पडू नये यासाठी वाघांचे खाद्य असणाऱ्या तृणभक्षी प्राण्यांच्या व्यवस्थापनावर भर देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले होते. हे व्यवस्थापन योव्या पध्दतीने झाले तर वाघ बाहेर पडणार नाही. यात मानसंचाही जीव जाणार नाही आणि वाघ देखील मृत्युमुखी पडणार नाहीत.

Story img Loader