भंडारा : भंडाऱ्यातील जवाहरनगरच्या आयुध निर्माणी कारखान्यात शुक्रवारी स्फोट झाल्याने ८ कामगार मृत्यूमुखी पडले. या घटनेमुळे कामगारांमध्ये रोष असून त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव करीत मारहाण केली. यामुळे येथील वातावरण तापले आहे. कंपनी व्यवस्थापनाच्या दुर्लक्षित पणामुळे तसेच अधिका-यांच्या मनमानीमुळे कोवळी तरूण मुले आणि कामगार यात दगावल्यने त्यांचे कुटुंबीय संतापले असून त्यांनी या घटनेचा जाब विचारण्यासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत मारहाण केली. त्यामुळे वातावरण चिघळले आहे. आज कारखाना बंद ठेवण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान कंपनीतील एका शिकाऊ विद्यार्थ्यांने सांगितले की, मागील अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार याबाबत निवेदन देऊन प्रशिक्षणार्थीना अशा विभागात कामासाठी पाठवू नये असे सांगण्यात आले. मात्र अधिकाऱ्यांकडून या प्रशिक्षणार्थींना कायम दबावात ठेवण्यात येत होते. कुणी विरोध केला तर ‘ काम करायचे असेल तर करा नाही तर नोकरी सोडून द्या ‘ असे उर्मटपणे सांगितले जायचे. त्यामुळे नाईलाजास्तव या प्रशिक्षणार्थींना येथे काम करावे लागत होते.

जीएम कार्यालयासमोर आंदोलन…

२० वर्षीय अंकित बारई या प्रशिक्षणार्थीचा नाहक बळी गेल्यानंतर इतर कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अनेक कर्मचारी, प्रशिक्षणार्थी यांनी रात्री उशिरा साहुली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरीष्ठ अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी केली असून आज सकाळ पासून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अंकित बारई याला न्याय मिळावा या मागणीसाठी आंदोलन पेटले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eight workers died in a bhandara ordnance factory explosion leading to attack on officials by workers and family ksn 82 sud 02