विदर्भातील प्रश्नावर आक्रमक होतानाच विदर्भाची ओळख गडकरींनी कशी टिकवून ठेवली याबाबतची स्तुतीसुमने एकनाथ खडसे यांनी विदर्भ प्रश्नांवरील चर्चेदरम्यान उधळली. तो एक माणूस सोडला तर विदर्भात आहे काय, असा प्रश्न त्यांनी सत्ताधाऱ्यांना केला.तीनवेळा गोसेखुर्दचे उद्घाटन झाले, पण प्रकल्प काही समोर सरकत नव्हता. नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला आणि प्रकल्पाला मार्ग मिळाला. त्यामुळे या प्रकल्पासाठी कुणाचे अभिनंदन करायचे असेल तर ते नितीन गडकरी यांचे.
हेही वाचा >>>हकालपट्टी करा.. हकालपट्टी करा.. भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी करा…; महाविकास आघाडीकडून सत्ताधाऱ्यांविरोधात निदर्शने
गडकरींचा साखर कारखाना वगळता राज्यात एकाही साखर कारखान्याची स्थिती चांगली नाही. गडकरींचा कारखाना तर ‘मेरीट’वर चाललाच आहे, पण गडकरींची सर्वच काम मेरीटवर चालतात. गडकरी आहेत म्हणूनच तुम्ही आहात, असा टोलाही खडसे यांनी सत्ताधाऱ्यांना हाणला. त्यांनी देशभरात रस्ते केल्यामुळे सरकार चांगले चालले आहे. ती एकमेव व्यक्ती अशी आहे, ज्यांचे देशभरात कौतुक होत आहे.