इतर पक्षांच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करणारा भारतीय जनता पक्ष स्वत:च किती भ्रष्ट आहे हे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यामुळे स्पष्ट झाले आहे. जाहीर सत्काराच्या वेळी बोलताना पटेल यांनी कार्यकर्त्यांना निराश न होण्याचा सल्ला दिला. लोकांची कामे करून पक्ष वाढवा, असे आवाहन त्यांनी केले. भाजप दोन खासदारावरून लोकसभेत बहुमत मिळू जाहीर सत्कार करण्यात आला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी खडसे आणि भारतीय जनता पक्षावर सडकून टीका केली. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड फेकायचे नसतात. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना भाजपचे नेते कुठलेही पुरावे हाती नसताना आमच्यावर आरोप करीत होते. भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देऊ असा दावा करीत होते. सत्तेवर येत नाहीत, तोच या पक्षाच्या नेत्यांनी केलेले घोटाळे उघड होऊ लागले आहेत. खडसे यांनी गैरव्यवहार केल्याचे उघड असतानाही त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला. मात्र, माध्यमांनी हे प्रकरण उचलून धरल्याने त्यांना अखेर राजीनामा द्यावा लागला. भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर या पक्षाचा खरा चेहरा आता उघड झाला आहे, खडसेंच्या राजीनाम्यामुळे हे प्रकरण संपणार नाही तर या प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे. ही फक्त सुरुवात आहे, पुढच्या काळात अनेक मोठे घोटाळे पुढे येण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले. मोदींनी स्वच्छ भारत मोहीम हाती घेतली आहे. स्वच्छ भारत म्हणजे केवळ रस्ते स्वच्छ करणे नव्हे तर पक्षांतर्गत स्वच्छता अपेक्षित आहे, असा टोलाही त्यांनी हाणला. दरम्यान, मला पक्षाने राज्यसभेवर जाण्याची दिलेली संधी ही मी सन्मान म्हणून नव्हे तर जबाबदारी मानतो. विदर्भात पक्ष बळकट करण्यासाठी यापुढे आम्ही जिल्हावार लक्ष केंद्रित करणार आहोत.
तत्पूर्वी झालेल्या जाहीर सत्काराच्या वेळी बोलताना पटेल यांनी कार्यकर्त्यांना निराश न होण्याचा सल्ला दिला. लोकांची कामे करून पक्ष वाढवा, असे आवाहन त्यांनी केले. भाजप दोन खासदारावरून लोकसभेत बहुमत मिळू शकतो तर आपणही आपली संख्या वाढवू शकतो, असे त्यांनी सांगितले. दोन वर्षांच्या सत्ता काळात भाजपने लोकांचा अपेक्षाभंग केला आहे. समाजातील एकही वर्ग त्यांच्यामुळे खुश नाही. ‘जीडीपी’ वाढल्याचा दावा केला जात असला तरी तो दिशाभूल करणारा आहे. केंद्रात तिसऱ्या आघाडीची चर्चा असली तरी वेळ पडल्यावर याबाबत आपला पक्ष निर्णय घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा