लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांच्या कोराडी येथील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली.

एकनाथ शिंदे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. रविवारी त्यांनी रामटेक मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्यासाठी नागपुरात कार्यकर्ता मेळावा घेतला. सोमवारी पारशिवनी येथे जात असताना त्यांनी कोराडीत बावनकुळे यांची भेट घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. यावेळी रामटेक लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती आहे.

आणखी वाचा-भाजप नेते विजयराज शिंदेंचे बंड ठरले औट घटकेचे! म्हणाले, “अबकी बार…”साठी माघार

विदर्भातील वातावरण युतीसाठी पोषक- मुख्यमंत्री

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे माझे मित्र आणि सहकारी आहेत. ते स्वतः विदर्भात प्रचार करत आहेत. विदर्भातील वातावरण महायुतीला अनुकूल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज आणि बुधवारी चंद्रूपूर व नागपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आहे. त्यांच्या सभेमुळे महायुतीतील सर्व उमेदवारांना फायदा होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde chandrasekhar bawankule meeting in koradit discussion on political issues cwb 76 mrj