नागपूर : निवडणूक आयुक्त देखील निवडणुकीद्वारे निवडून आणावे अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. मात्र त्यांची मागणीच ही अर्थाने हास्यास्पद असल्याची टीका करत आम्हाला जेलमध्ये टाकू अशी भाषा बोलणारे उद्धव ठाकरे यांच्यामध्ये अलीकडे आमुलाग्र बदल असून ही चांगली बाब असल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या कक्षात बोलत होते. निवडणूक आयुक्त देखील निवडणुकीद्वारे निवडून आणावे अशी मागणी मंगळवारी उद्धव ठाकरे यांनी केली. खरे तर ही मागणीच हास्यास्पद आहे. तशीच ती घटनेला आव्हान देणारी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने हे सर्व निर्णय घेतलेले आहे. म्हणुन एक प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा अवमान आहे.

हे ही वाचा… फडणवीसांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरेंनी नागपूर का निवडले ?

शासकीय यंत्रणा या घटनात्मक पद आहे. मात्र जेव्हा तुमच्या बाजूने निकाल लागतो त्यावेळेस तुम्हाला त्यावर हरकत नसते, मात्र तोच निकाल विरोधात गेला तर त्यावर आक्षेप घेणे हे योग्य नाही. हा बाबासाहेबांचा आणि राज्यघटनेचा अपमान असल्याचे शिंदे म्हणाले.

उद्गव ठाकरे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली ही चांगली बाब आहे. राज्याचे प्रमुख त्यांना कोणीही भेटण्यासाठी येऊ शकते. परंतु हे चित्र बघितल्या नंतर, अगदी टोकाची टीका करणारे, एकमेकांना संपवण्याची भाषा करणारे, आणि जेलमध्ये टाकण्याची भाषा करणारे तसेच भाजप आणि महायुतीच्या नेत्यांना सरकार आल्यावर तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे हेच लोक होते.

लोकसभेत मिळालेल्या विजयानंतर हे लोक आम्ही तुम्हाला जेल मध्ये टाकू असेही बोलले होते. मात्र अलीकडे त्यांच्यात अमुलाग्र बदल दिसून आला ही चांगली बाब आहे.

विरोधकांचा विजय झाला तर ईव्हीएमवर आक्षेप घेतला जात नाही. मात्र पराभव झाला तर ईव्हीएमवर आक्षेप घेतात ही त्यांची दुटप्पी भूमिका आहे. न्यायालय ही म्हणाले आहे की पराजय झाला तरच ईव्हीएमबाबत आक्षेप विरोधक घेतात. ईव्हीएमवर निवडणूक होऊन काँग्रेसने देखील अनेक निवडणुका जिंकल्या, २००९ मध्ये काँग्रेस इव्हीएम निवडणुकीवरच सत्तेवर आली.

हे ही वाचा… हिंदू देवस्थानाप्रमाणे मशीद, चर्चही सरकारी नियंत्रणात येऊ शकते? आता तर थेट विधानसभा अध्यक्षांनीच…

सर्वोच्च न्यायालयाने देखील ईव्हीएम बाबत त्यांनी केलेली याचिका नाकारली. त्यामुळे विजय झाला की ईव्हीएम चांगले आणि निवडणुकीत पराभव झाला तर ईव्हीएम वर शंका म्हणजे विरोधी पक्षाचे हे दुटप्पी धोरण आहे अशी टीका शिंदे यांनी केली आहे. मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता खातेवाटप होईल. विरोधकांनी चिंता करु नये.

त्यांच्या विविध विभागाच्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यासह मी अजित पवार त्यांनी उत्तर देण्यास तयार आहे असेही शिंदे म्हणाले.

Story img Loader