अकोला : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. संपूर्ण राज्यात यश मिळवण्यासाठी विभागनिहाय मोर्चेबांधणी केली जात आहे. शिवसेना शिंदे गटाकडून पश्चिम वऱ्हाडात पक्ष वाढीचे लक्ष्य ठेवण्यात आले. त्यासाठी पक्षाला केंद्र शासनामध्ये मिळालेले एकमेव केंद्रीय राज्यमंत्रिपद व विधान परिषदेचे सदस्यत्व देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भागाला झुकते माप दिले. अकोला जिल्ह्यात मात्र पक्षातील मरगळ कायम असून संघटनात्मक वाढीचे आव्हान आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी प्रमुख पक्षांकडून प्रत्येक जिल्हानिहाय बांधणी केली जात आहे. शिवसेना शिंदे गटाचे पश्चिम वऱ्हाडात संघटन मजबूत करण्याचे प्रयत्न आहेत. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव व दोन्ही आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. यवतमाळ व वाशिमच्या माजी खासदार भावना गवळी यांनी देखील शिंदेंना साथ दिली. शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या पश्चिम विदर्भातील लोकसभेच्या जागा कायम राखण्याचे मोठे आव्हान एकनाथ शिंदेंपुढे होते. त्यामध्ये बुलढाण्यात त्यांना यश आले, तर यवतमाळ-वाशिम मतदारसंघात अपयशाचा सामना करावा लागला. बुलढाणा मतदारसंघातसुद्धा ऐनवेळी आखलेली रणनीती प्रतापराव जाधव यांच्या पथ्यावर पडली. त्यामध्ये प्रदेश स्तरावरील एका पदाधिकाऱ्याचे नियोजन महत्त्वपूर्ण ठरले. केंद्र शासनामध्ये स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्रिपद शिवसेना शिंदे गटाला मिळाले. या एकमेव पदाची ‘लॉटरी’ प्रतापराव जाधव यांना लागली. यानिमित्ताने शिवसेना शिंदे गटाच्या कोट्यातून पश्चिम वऱ्हाडाला केंद्रीय मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळाले.

Bharatiya Janata Party continues to pursue the state government for waiver of penalty on property tax panvel municipal corporation
पनवेल: शास्तीमाफीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Navi Mumbai Municipal Corporation Encroachment Department takes action against illegal constructions in Nerul and Ghansoli
नेरुळ, घणसोलीतील बेकायदा बांधकामांवर कारवाई; महापालिकेच्या नोटिशीकडे दुर्लक्ष करून बांधकामे
shinde shiv sena door open to bjp rebels in navi mumbai
भाजपविरोधी बंडखोरांना शिंदे गटाचे दार खुले? पालिकेत वर्चस्व मिळवण्यासाठी व्यूहरचना
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : ‘मविआ’ला धक्का बसणार? “अनेकजण शिवसेना, भाजपाच्या संपर्कात”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
Thane , government projects, dust, health,
सरकारी प्रकल्पांमुळेच धुळधाण, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?

हेही वाचा – विशाळगडावरून राजकीय चिखलफेक अधिक; मूळ प्रश्नाचे गांभीर्य हरपले

लोकसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर भावना गवळी यांना विधान परिषदेवर घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. केंद्रातील मंत्रिपद व आता विधान परिषदेच्या सदस्यत्वामुळे शिवसेना शिंदे गटाने पश्चिम वऱ्हाडाला बळ दिले आहे. पश्चिम वऱ्हाडातील अकोला, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीमध्ये यश मिळण्यासाठी शिंदे गटाकडून हा डाव टाकण्यात आला. तीन जिल्ह्यांत पक्ष संघटन मजबूत करून विधानसभेच्या अपेक्षित जागा निवडून आणण्याचे आव्हान केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व आमदार भावना गवळी यांच्यापुढे राहील.

अकोला जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गट अद्याप संघटनात्मक दृष्ट्या वाढू शकलेला नाही. शिवसेनेचे दोन गट झाल्यावर काही नेत्यांनी शिंदे गटाची वाट धरली तरी तळागाळातील सर्वसामान्य शिवसैनिक उबाठा सेनेसोबत असल्याचे दिसून येते. शिवसेना शिंदे गटाकडून अकोला जिल्ह्यात संघटनात्मक फेरबदल करण्यात आले. मात्र, त्यानंतरही पक्षात फारसा फरक पडलेला नाही. आता विधानसभेच्या तोंडावर पक्षाला बळकटी देण्यासोबतच निवडणुकीच्या तयारीवर भर द्यावा लागणार आहे.

हेही वाचा – कोट्यवधींच्या तांदूळ चोरी प्रकरणात अटक झालेले भाजपा नेते कोण? काय आहे प्रकरण?

शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचे राज्यातील सर्व विभागावर सूक्ष्मपणे लक्ष आहे. त्यांनी पश्चिम वऱ्हाडातील केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, विधान परिषदेच्या आमदार भावना गवळी व पूर्व विदर्भातील कृपाल तुमाने यांना बळ दिले. या भागात पक्ष संघटन अधिक मजबूत करून आगामी निवडणुकीत यश मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहे. – रामेश्वर पवळ, राज्य समन्वयक, शिवसेना.

Story img Loader