नागपूर: रामटेक हा शिवसेनेचा गड. पण तो एकीकृत शिवसेनेचा. शिवसेनेत फूट पडली. कट्टर सैनिक उध्दव ठाकरेंसोबत तर इतर सत्तेसोबत गेले. जागा वाटपात भाजपने ही जागा बळकावण्याचा प्रयत्न केला. शिंदेंनी जागा वाचवली पण भाजपने आयात करून दिलेला उमेदवार ( राजू पारवे) त्यांनी स्वीकारला. आता ही जागा शिंदेसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. शिंदेंची मुंबईतील एक चमू येथे तळ ठोकून आहे. मात्र गुप्तचर यंत्रणेची माहिती महायुतीच्या विरोधात जाणारी असल्याने खुद्द शिंदे मंगळवारपासून रामटेक मतदारसंघात तळ ठोकून आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे शामकुमार बर्वे व शिवसेनेचे राजू पारवे अशी लढत आहे. सेनेचे उमेदवार पारवे हे उमेदवारी मिळण्याच्या एक दिवस आधी शिवसेनेत आले. तसे ते भाजपमध्ये जाणार होते. पण जागा भाजपला मिळाली नाही. त्यामुळे भाजपच्या सांगण्यावरूनच त्यांनी शिंदे सेनेचा पर्याय निवडला. भाजपने त्यांच्यासाठी मोदींची सभा आयोजित केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचार सभा घेतल्या. पण वातावरण प्रतिकूल असल्याचे लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचाराच्या अंतिम टप्प्यात रामटेकमध्ये प्रचाराला धाऊन आले. मंगळवारी त्यांनी काटोल, नरखेडमध्ये सभा घेतल्या. बुधवारी ते रामटेकमध्ये रोड शो करणार आहेत. मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली.

हेही वाचा…“बायको परत मिळवून द्या, फेसबुक मित्राबरोबर पळाली…’ नवऱ्याची उच्च न्यायालयात धाव

शिंदे गटाची भाजपमूळे अडचण

काँग्रेसने रामटेकमधून जि प. माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली होती. त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याची तक्रार झाली. शासनाने तातडीने चौकशी केली. जात पडताळणी प्रमाणपत्र समितीने बर्वे यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले. त्याचा आधार घेऊन निवडणूक विभागाने बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवला.त्यामुळे त्या रिंगणात बाहेर गेल्या. सरकारी यंत्रणेवर दबाव आणून हे सर्व केले गेले, असा आरोप रश्मी बर्वे यांचा आहे. हाच मुद्दा त्या प्रचारसभेत मांडतात. त्यामुळे त्यांना सहानुभूती मिळते. प्रमाणपत्र रद्द करण्यात महायुतीचा हात नाही, असे नेत्यांनी स्पष्ट केले. पण त्याचा फायदा झाला नाही. मोदींची सभा झाली.पण अपेक्षित परिणाम साधू शकली नाही. त्यामुळे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांपासून रामटेक मध्ये प्रचारासाठी फिरतं आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde takes charge of ramtek campaign amidst tough contest cwb 76 psg